फ्रान्समध्ये चाकू हल्ला ; ३ जण ठार तर अनेकजण जखमी

29 Oct 2020 16:36:54

France_1  H x W
 
नवी दिल्ली : फ्रान्समध्ये चाकू हल्ल्यात ३ व्यक्तींचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. देशाच्या दक्षिण भागातील नीस शहरात एका चर्चजवळ ही घटना घडली. फ्रान्समधील शिक्षकाचा शिरच्छेद केल्यानंतर संपूर्ण फ्रान्समध्ये खळबळ उडाली होती. त्यानंतर गुरुवारी पुन्हा चाकूहल्ल्याची घटना घडली. या हल्ल्यामागे कट्टरतावादी किंवा दहशतवादी आहेत का? या अनुषंगाने पोलीस तपास करत आहेत.
 
 
फ्रान्समधील एका शिक्षकाने वर्गात शिकवत असताना प्रेषित मोहम्मद यांचे व्यंगचित्र दाखविले होते. त्यानंतर मुस्लिम कट्टरतावाद्याने या शिक्षकाचा भररस्त्यात शिरच्छेद केला. या घटनेचे संपूर्ण देशात पडसाद उमटले होते. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष एम्यॅन्युअल मॅकरॉन यांनी या घटनेचा कठोर शब्दात निषेध केला. मुस्लिम धर्माबाबत त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून त्यांच्यावर टीका होत आहे. अनेक देशांनी फ्रेंच मालावर बहिष्कार घालण्याची हाक दिली.
 
 
व्यंगचित्र वर्गात दाखविल्याप्रकरणी मॅकरॉन यांनी माफी मागण्यास नकार दिला. तसेच जगभरात मुस्लिम धर्म संकटात असल्याचे ते म्हणाले. कट्टरतावाद्यांविरोधात लढण्यासाठी उपाययोजना करण्याची त्यांनी घोषणा केली. धर्मनिरपेक्षता फ्रान्सचा मूळ गाभा असल्याचे ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यानंतर मुस्लिम देशांतून त्यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0