लॉकडाऊनमध्ये वेळेवर EMI भरणाऱ्यांना मिळणार 'कॅशबॅक'

25 Oct 2020 12:44:08
EMI_1  H x W: 0
 

नवी दिल्ली : केंद्र सरकारने व्याजमाफीसाठी नवे दिशानिर्देश जारी केले असून मार्च ते ऑगस्ट दरम्यान ज्यांनी मोरोटोरियमचा लाभ घेतलेला नाही, त्यांना कॅशबॅक देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारने जारी केलेल्या दिशानिर्देशांनुसार, टाळेबंदीच्या काळात म्हणजे मार्च ते ऑगस्ट या कालावधीत ज्यांनी मोरोटोरियमचा लाभ घेतलेला नाही, त्यांना केंद्र सरकारतर्फे अनुग्रह राशी म्हणजेच कॅशबॅक देण्यात येणार आहे. हा लाभ २ कोटी रुपयांपर्यंत कर्ज घेतलेले छोटे उद्योजक अथवा व्यक्तींना मिळणार आहे. त्याचप्रमाणे ज्यांनी मोरोटोरियमचा लाभ घेतला आहे, त्यांनादेखील याप्रकारचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Powered By Sangraha 9.0