कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या स्मार्ट सिटीचे काम संथ गतीने सुरु असल्याचे भाजप खासदार कपील पाटील यांनी प्रशासनाला सुनावले आहे. आज पार पडलेल्या स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या आढावा बैठकीत त्यांनी हा संताप व्यक्त केला.
महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत महापालिका मुख्यालयात कंट्रोल कमांड रूम तयार करण्यात आली आहे. त्याचे सादरीकरण आज करण्यात आले. याबैठकीला खासदार पाटील यांच्यासह खासदार श्रीकांत शिंदे, भाजप आमदार रविंद्र चव्हाण, गणपत गायकवाड, मनसे आमदार राजू पाटील, शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आदी उपस्थित होते. महापालिका कल्याण डोंबिवली शहरात स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत २० ठिकाणी सिग्नल यंत्रणा उभारत आहे. त्यापैकी कल्याणमध्ये पाच ठिकाणी सिग्नल यंत्रणा उभारली आहे. त्याचे कंट्रोल कमांट रुममध्ये काय व कसे स्वरुप दिसते याचे सादरीकरण या बैठकीत केले. केंद्र सरकारने स्मार्ट सिटीसाठी निधी दिला आहे. त्याचा कुठेही उल्लेख दिसून येत नाही. स्मार्ट सिटी प्रकल्पाचे लावलेले फलक इतके लहान आहे. त्याठिकाणी काय वाचता येत नाही. दिसून येत नाही. पैसै केंद्राचा असून ही कंजूषी कशासाठी असा प्रश्न उपस्थित केला. त्यावेळी काही ठिकाणी मोठे व काही ठिकाणी छेाटे बोर्ड लावल्याचे आयुक्तांनी कबूल केले.
१९४कोटी रुपयांचा निधी महापालिकेस केंद्र व राज्य सरकारकडून स्मार्ट सिटीसाठी प्राप्त झालेला असताना प्रकल्पाचे काम अत्यंत संथगतीने सुरु असून त्याची गती वाढविण्याच्या सूचना दिल्याचे खासदार पाटील यांनी सांगितले. मनसे आमदार राजू पाटील यांनी फलक मराठीत असावे हा मुद्दा मांडला. तोच मुद्दा खासदार पाटील यांनी धरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मातृभाषेतून शिक्षणाचा आग्रह धरला आहे. त्यामुळे फलकही मराठीतून असावेत यावर जोर दिला. भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी काही वर्षापूर्वी विद्याथ्र्याचे अपहरण व खूनाच्या घटना घडल्या होत्या. आजही विद्याथ्र्याच्या अपहरणाच्या घटना घडू शकतात. त्यामुळे स्मार्ट सिटी प्रकल्पात विद्यार्थी व शाळा कंट्रोल कमांड रुमशी यंत्रणोशी जोडल्या गेल्या पाहिजेत. आमदार चव्हाण यांनीही कामाच्या गतीविषयी तीव्र नाराजी व्यक्त करीत स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या अधिकारी वर्गास फैलावर घेतले. आयुक्त सूर्यवंशी यांनी मार्च पासून कोरोना काळात सगळे लक्ष कोरोनावर मात करण्यावर दिले गेले. त्यामुळे स्मार्ट सिटीच्या कामात खंड पडला होता. आात्ता पुन्हा नव्याने हे काम गतीमान केले जाईल. स्मार्ट सिटी प्रकल्पा अंतर्गत सिग्नल यंत्रणा कार्यान्वीत केली जात आहे. सीसीटीव्ही लावले जात आहे. स्टेशन परिसराची विकासाची निविदा मंजूर आहे. ही कामे मार्गी लावण्यावर भर दिला जात आहे.