'दसऱ्यापर्यंत मंदिरे न उघडल्यास टाळे तोडो आंदोलन करू'

24 Oct 2020 19:49:04

vhp_1  H x W: 0


डोंबिवली : दसऱ्यापर्यंत मंदिरे खुली करावीत अन्यथा टाळे तोडे आंदोलन करू असा इशारा विश्व हिंदू परिषदेने राज्य सरकारला दिला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये याकरिता मार्च महिन्यात मंदिरे आणि धार्मिक स्थळे बंद करण्यात आली होती. मिशन बिगेन अगेन अंतर्गत हळूहळू सर्वच व्यवसाय टप्प्याटप्प्याने उघडण्यात आले आहेत. पण मंदिरे अद्याप उघडली नाहीत . मंदिरे उघडण्यात यावी याकरिता गणोश मंदिरासमोर विश्व हिंदू परिषदेने आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान त्यांनी सरकारला इशारा दिला आहे.


विश्व हिंदू परिषदेचे कल्याण जिल्हा संयोजक करण उल्लेगल म्हणाले, केंद्र शासनाच्या मार्गदर्शनानुसार देशभरात मंदिरे खुली करण्यात आली आहे. मंदिरे खुली झाल्याने कोरोना रुग्णाची आकडेवारी वाढली आहे असे कुठे ही दिसून आले नाही. महाराष्ट्रात सर्व मंदिरांना टाळेबंद करण्यात आले आहे. महाआरतीचा कार्यक्रम म्हणून कायद्यात बसेल असे हे आंदोलन केले आहे. कोरोना विषाणू संसर्ग आणि लॉकडाऊनपासून बंद असलेली धार्मिक स्थळं उघडण्यासाठी विश्व हिंदू परिषदेनेआज एका मोर्चाचं आयोजन केले आहे.
Powered By Sangraha 9.0