बीएमसीचे सामान्य मुंबईकरांच्या प्रशांकडे दुर्लक्ष : भाजप

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Oct-2020
Total Views |

TB Hospital_1  
 
मुंबई : मुंबईमधील शिवडी येथे असलेल्या टीबी रुग्णालयातील एक धक्कादायक प्रकार समोर आला. या रुग्णालयातून गेले ७ दिवस बेपत्ता असलेल्या एका रुग्णाचा मृतदेह रुग्णालयाच्या बाथरूममध्येच सापडला. २७ वर्षाच्या या तरुणाचा मृतदेह रुग्णालयात आढळल्याने रुग्णालयाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. यावरून आता भाजप आक्रमक झाली असून ‘मुंबई महानगर पालिका ही सामान्य मुंबईकरांच्या प्रशांकडे सातत्याने दुर्लक्ष करत आहे’ अशी टीका केली आहे.
 
 
 
 
 
२७ वर्षीय रुग्णाला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्याला टीबी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. ४ ऑक्टोबरपासून तो बेपत्ता होता. त्याची कोणतीही माहितीही न मिळाल्याने रुग्णालय प्रशासनाने तो बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांकडे केली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास केल्यावर त्यांना १८ ऑक्टोबरला त्याचा मृतदेह हा बाथरुममध्ये सापडला. जवळपास १४ दिवसांपासून त्याचा मृतदेह हा बाथरुममध्येच पडून होता. मात्र तरीही याचा कोणालाही थांगपत्ता लागला नाही. यामुळे प्रशासनाचा आणि रुग्णालयाचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@