ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

23 Oct 2020 16:10:47

eknath khadse_1 &nbs



मुंबई :
ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे उर्फ नाथाभाऊ यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला आहे. मुलगी रोहिणीसह ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यालयात त्यांचा पक्षप्रवेश होत आहे. राष्ट्रवादीच्या ११ दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत खडसेंचा पक्षप्रवेश पार पडला, मात्र प्रकृतीच्या कारणास्तव अजित पवार या सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत.



यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अरुण गुजराथी यांनी खडसेंना म्हटले एकनाथ खडसे, तुम्ही राष्ट्रवादीचे ३ आमदार पाडले, आता ५ निवडणून आणा त्यानंतर सभागृहात हशा पिकला. एकनाथ खडसे यांच्या वाट्याला कटुता आली असे देखील ते म्हणाले. शुक्रवारी दुपारपासूनच खडसेंच्या कार्यकर्त्यांची पक्ष कार्यालयाबाहेर एकच गर्दी होती. नाथाभाऊंना मंत्रीपद द्या ! अशी समर्थकांची मागणी आहे. शरद पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्यातील बैठक लांबल्याने या पूर्वनियोजित कार्यक्रमाला वेळ लागला. खडसेंसह राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि इतर मंत्री व नेते उपस्थित होते. मात्र, पवार आणि आव्हाड यांची वाट पाहत साऱ्यांचाच खोळंबा झाला.


खडसेंचा वापर फडणवीसविरोधासाठी


एकनाथ खडसे यांनी ज्या प्रकारे भाजपवर टीका न करता देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले. ते पाहता राष्ट्रवादी काँग्रेस भाजप विरोधात किंबहुना देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात राजकीय सुरुंग लावण्यासाठी खडसेंचा वापर करणार, अशी खेळी पवारांची असू शकते, अशीही शक्यता आहे.


मंत्री पद मिळणार का ?


एकनाथ खडसे ज्या काळात राज्यातील महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सहभागी झाले आहेत, ते पाहता त्यांना मंत्रीपद मिळणार का याकडे साऱ्यांचे लक्ष्य आहे. याबद्दल काय बोलणी झाली त्याची माहिती खडसे आणि राष्ट्रवादी यांनी दिलेली नाही. त्यामुळे खडसे मंत्रीपद मिळवतात का हे देखील पाहणे औत्सुक्याचे आहे.


Powered By Sangraha 9.0