मोहम्मद पैगंबरांचे 'ते' व्यंगचित्र झळकले फ्रेंच शासकीय इमारतीवर

23 Oct 2020 18:20:18

charlie hebdo_1 &nbs



पॅरिस :
फ्रान्समधील 'चार्ली हेब्दो' या साप्ताहिक मासिकातील व्यंगचित्र स्थानिक सरकारी इमारतीवर झळकावत एका फ्रेंच शहराने इस्लामिक दहशतवादाचा निषेध केला. बुधवारी संध्याकाळी शिक्षक सॅम्युअल पॅटी यांना राष्ट्रीय श्रद्धांजली म्हणून हे व्यंगचित्र झळकाविण्यात आले. ग्रेट पॅरिस परिसरातील इतिहास विषयाचे शिक्षक असलेल्या सॅम्युअल पॅट या शिक्षकाने मोहम्मद पैगंबर यांचे एक व्यंगचित्र अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा धडा शिकवत असताना आपल्या वर्गात दाखवले म्हणून त्यांचा काही इस्लामी दहशतवाद्यांनी भर रस्त्यात शिरच्छेद केला होता. या घटनेचा निषेध म्हणून हे व्यंगचित्र स्थानिक सरकारी इमारतीवर झळकावत आले आहे. शहरातील दोन टाऊन हॉल - माँटपेलियर आणि टूलूझ येथे बुधवारी संध्याकाळी चार तासांसाठी हे व्यंगचित्र झळकाविण्यात आले. एका फ्रेंच शहराने इस्लामी दहशतवादाचा निषेध केल्यामुळे बुधवारी संध्याकाळी सशस्त्र पोलिस अधिकाऱ्यांसह मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.


इस्लामी प्रेषित मोहम्मद यांचे व्यंगचित्र अनेक हल्ल्यांमध्ये इस्लामी दहशतवाद्यांनी औचित्य म्हणून वापरले आहे. त्यातील काही हल्ले प्राणघातक आहेत. २०१५ मध्ये इस्लामी बंदूकधार्‍यांनी चार्ली हेबडोच्या ऑफिसवर हल्ला केला होता, त्यामध्ये अनेक संपादकीय कर्मचार्‍यांचा बळी गेला होता. त्यानंतर सप्टेंबर २०२० मध्ये पुन्हा एकदा हल्ला करण्याचा नवीन कार्यालयावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. शुक्रवारी १६ ऑक्टोबर रोजी पुन्हा एकदा इतिहास विषयाचे शिक्षक असलेल्या सॅम्युअल पॅट या शिक्षकाने मोहम्मद पैगंबर यांचे एक व्यंगचित्र अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा धडा शिकवत असताना आपल्या वर्गात दाखवले म्हणून त्यांचा काही इस्लामी दहशतवाद्यांनी भर रस्त्यात शिरच्छेद केला होता. मात्र शुक्रवारी झालेल्या हल्ल्याचा फ्रेंच सरकारकडून जोरदार निषेध करण्यात आला. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनीसुद्धा धर्मांध इस्लामींविरोधात कठोर भूमिका घेतली. सॅम्युअल पॅटी यांच्या खुनाच्या घटनेला त्यांनी ‘इस्लामी दहशतवादी हल्ला’ म्हटले. इस्लामी कट्टरतावादाच्या समूळ उच्चाटनासाठी आपण काम करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

Powered By Sangraha 9.0