नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी मदतीसाठी किती वाट पहायची?

23 Oct 2020 11:40:27

Uddhav Thackeray_1 &
 
 
मुंबई : महाराष्ट्रामध्ये परतीचा पाउस आणि पूरस्थिती यामुळे शेतकऱ्यांचे आतोनात हाल झाले. यावरून महाराष्ट्र सरकारकडून योग्य वेळेस मदत होत नसल्याने विरोधी पक्षाने नाराजीचा सूर लगावला आहे. मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारमधील इतर नेत्यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर शुक्रवारी बैठक होणे अपेक्षित होते. मात्र, राज्य सरकारने ही मंत्रिमंडळ बैठक पुन्हा रद्द केली. यावरुन भाजप आमदार अतुल भातखळकरांनी ‘नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी मदतीसाठी आणखी किती वाट पहायची?’ असा प्रश्न सरकारला विचारला आहे.
 
 
 
 
 
भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ट्वीतमध्ये म्हंटले आहे की, “आज होणारी मंत्रिमंडळ बैठकही रद्द, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी मदतीसाठी अजून किती वाट पाहायची? नुकसानग्रस्त भागात सहल झाली, आता प्रत्यक्ष मदत करायच्या वेळी मंत्रिमंडळाची बैठक रद्द केली. निदान पूरग्रस्तांच्या जखमेवर मीठ तरी चोळू नका.” अशी टीका केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोलापूर पाहणी दौऱ्यावेळी गुरुवारी मंत्रिमंडळ बैठकीत या विषयावर चर्चा करुन शेतकऱ्यांना दिलासा देऊ, असे आश्वासन महसूलमंत्री थोरात यांनी दिले होते. पण गुरुवारी होणारी बैठक रद्द करण्यात आली. त्यानंतर ही बैठक शुक्रवारी होणार असे सांगण्यात आले. पण ही बैठकही आता आठवड्याभरासाठी पुढे ढकलण्यात आल्याची माहिती देण्यात येत आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0