रणगाडा विरोधी 'नाग' क्षेपणास्त्रची यशस्वी चाचणी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Oct-2020
Total Views |

Nag missile_1  
 
 
नवी दिल्ली : भारतीय संरक्षण क्षेत्राच्या दृष्टीने भारतीय सैन्याने आणखी एका क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. ‘नाग’ या रणागडा विरोधी क्षेपणास्त्राची चाचणी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेकडून (डीआरडीओ) सकाळी ६.४५ वाजता पोखरणच्या आर्मी रेंजवर ही पार पडली. वॉटरहेडसह या रणगाडा विरोधी क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली. चार किलोमीटर रेंज असलेले हे क्षेपणास्त्र खांद्यावरुन डागता येते. भारतीय लष्करामध्ये या क्षेपणास्त्राचा लवकरच समावेश केला जाणार आहे.
 
 
 
 
सैन्याच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ ऑक्टोबरला बालासोर टेस्ट रेंजवर स्टँड ऑफ अँटी टँक मिसाइलची चाचणी करण्यात आली होती. या क्षेपणास्त्राद्वारे १० किलोमीटर अंतरावरील रणगाडा उडवता येऊ शकतो. भविष्यामध्ये लढाऊ हेलिकॉप्टरवर हे क्षेपणास्त्र बसवण्यात येणार आहे. परंतु, तीन दिवसापूर्वीची जमिनीवरुन करण्यात आलेली चाचणीदेखील यशस्वी ठरली. यानंतर नाग क्षेपणास्त्राची आजची दहावी चाचणी यशस्वी ठरली. त्यामुळे लष्करात या क्षेपणास्त्राचा समावेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@