नवरात्रीनिमित्त अश्विनी जडे यांनी साकारली देवीची विविध रूपे

22 Oct 2020 17:05:26

Ashwini Jade_1  
 
डोंबिवली (जान्हवी मोर्ये) : रंग आणि रेषा काढून त्यात रांगोळीचे रंग भरत भावरेखा रेखाटणा:या डोंबिवलीतील कलाकार अश्विनी जडे यांनी नवरात्रीच्या निमित्ताने देवीची विविध रूपे साकारली आहेत. अश्विनी यांना चित्रकलेची आणि हस्तकलेची उत्तम जाण आहे. त्यामुळे उत्तम रांगोळी रेखाटण्यात त्यांचा हातखंडा आहे. त्या डोंबिवली पूव्रेतील गांधीनगर परिसरात राहतात. त्यांना लहानपणापासूनच चित्रकलेची आवड होती. चित्रकलेची आवड असली तरी ही कला बहरावी यासाठी त्यांनी कोणतेही प्रशिक्षण घेतले नव्हते.
 
 
कोणतेही प्रशिक्षण न घेता त्यांनी साकारलेली कलाकृती प्रेक्षकांच्या डोळ्य़ाचे पारणे फेडत असते. हेच त्यांच्या कलेचे वैशिष्टय म्हणावे लागेल. अश्विनी या प्रत्येक सणानुसार प्रासांगिक रांगोळी रेखाटतात. आतार्पयत त्यांनी निसर्ग चित्रण, भारतीय परंपरा लाभलेली व तिचे जतन करून ठेवलेली ग्रामीण जीवनपध्दती ,त्यांच्या चालरीतींचे सुंदर रेखाटन केले आहे. या चित्रतून त्यांनी समाजप्रबोधनात्मक संदेश देण्याचे ही काम केले आहे. रंगरेषांची सुरेख अदाकारी आकर्षक मनमोहक चित्ररचना हे सारे त्या रांगोळ्य़ामधून हळूवारपणे रेखाटतात. प्रत्येक सणाला त्या रांगोळी रेखाटत असतात. नवरात्री उत्सवात त्या गेल्या पाच वर्षापासून रांगोळी रेखाटत आहेत.
 
 
अश्विनी यांनी यंदाच्या नवरात्री उत्सवात तीन देवीच्या रांगोळ्य़ा रेखाटल्या आहेत. त्यात कोल्हापूरची महालक्ष्मी, म्हाळसादेवी, लक्ष्मी यांचा समावेश आहे. सध्या त्या सरस्वतीची रांगोळी काढण्यात व्यस्त आहे. ही रांगोळी काढण्यासाठी त्या केवळ पांढरी आणि रंगाच्या रांगोळीचा उपयोग करतात. अश्विनी यांनी रांगोळी किंवा चित्रकलेचे प्रशिक्षण घेतले नसले तरी त्या यु टयुब वर काही रांगोळी पाहत असतात. पण त्यांना एखादे चित्र समोर असले तरी रांगोळी काढण्यास पुरे होते. डोंबिवलीत गुढीपाडव्याला नववर्ष स्वागतयात्र काढली जाते. त्या यात्रेच्या निमित्ताने रस्त्यावर रांगोळ्य़ा काढल्या जातात. त्यात ही अश्विनी यांचा सहभाग असतो. स्वागतयात्रेच्या स्वागतासाठी त्या संस्कारभारतीची रांगोळी काढतात. अश्विनी या इनरव्हील क्लब ऑफ डोंबिवलीच्या अध्यक्ष आहेत. संस्थेच्या कार्यक्रमात त्या विविध रांगोळी काढत असतात.
 
 
 
Powered By Sangraha 9.0