कोरोना लसीची चाचणी करणाऱ्या डॉ.रेड्डीजच्या लॅबवर सायबर अटॅक

22 Oct 2020 14:44:11
dr reddy cyber attack_1&n




वी दिल्ली : फार्मा क्षेत्रातील दिग्गज कंपनी मानली जाणाऱ्या डॉ. रेड्डीजच्या लॅबवर सायबर अटॅक करण्यात आला आहे. यानंतर जगभरातील सर्व प्लान्ट्स तातडीने बंद करण्यात आले आहेत. सायबर अटॅक आणि प्लान्ट बंद होण्याच्या बातमीने डॉ. रेड्डीजच्या शेअर गडगडला. दुपारी १ वाजताच्या सुमारास शेअर १.१७ टक्क्यांनी घसरून ४९८५.३० रुपयांवर आला.
 
 
 
सकाळी १०.३० वाजता हल्ल्याची पहिली बातमी आली त्यावेळी तो २.९४ टक्क्यांनी घसरला होता. डॉ.रेड्डीज् भारताच्या बाहेर ब्राझील, रशिया, युके आणि युएसए या देशांतील प्लांट आहेत. अमेरिकेच्या वेळेनुसार सायंकाळी ४ वाजता हा हल्ला झाला आहे. कंपनी प्रवक्त्यांनी याबद्दल काहीही भाष्य करण्यास नकार दिला आहे.
 
 
डॉक्टर रेड्डीजच्या लॅबवर हल्ला झाल्याचे हे प्रकरण बरोबर भारतात कंपनीची कोरोना विषाणू लस Sputnik V ला दुसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी DGCA तर्फे मंजूरी देण्यात आली आहे. सायबर हल्ल्याच्या एक दिवस आधीच डॉक्टर रेड्डीज लॅब आणि रशीयाच्या सॉवरेन वेल्थ फंड रशियन डायरेक्ट इनव्हेस्टमेंट फंडने चाचणीची घोषणा केली होती.
 
 
सर्वर डेटा चोरी झाल्यानंतर कंपनीने डॉ. रेड्डीज लेबोरेटरीजतर्फे जगभरातील प्लांट बंद केले आहेत. डॉ. रेड्डीजचे अमेरिका, ब्रिटन, ब्राझील आणि रशियासह भारतातही प्लांट आहेत. कोरोना लस ही अनेक सायबर हल्लेखोरांच्या रडारवर आहे. अनेक देशांमध्ये कोरोना विषाणू लसीवरून स्पर्धाही लागली आहे. डॉ. रेड्डीजवर झालेला हल्ला मात्र, कुठून करण्यात आला याबद्दल माहिती मिळू शकलेली नाही.
 
 
दरम्यान, भारतात कोरोना विषाणूचा आकड्यांमध्ये सुधारणा दिसत असली तरीही जगभरातील इतर देशांमध्ये दुसरी लाट आली आहे. कोरोना मृत्यूवर नियंत्रण मिळवण्यासाठी भारताचे प्रयत्न सुरू आहेत. सरासरी दिवसाला आता ७००-८०० लोकांचा मृत्यू होत आहे. ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात हा आकडा हजार ते अकराशेवर पोहोचला आहे. भारतात एकूण १.१६ लाख कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत ७०३ लोकांचा मृत्यू झाला आहे.
 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0