जिओ 5G देणार चीनी कंपनी 'हुवावे'ला टक्कर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Oct-2020
Total Views |
JIO 5 G_1  H x


 
 
वॉशिंग्टन : जिओ 5G क्षेत्रात भरारी घेण्यासाठी सुसज्ज आहे. अमेरिकन तंत्रज्ञान कंपनी क्वालकॉमसह रिलायन्स जिओतर्फे अमेरिकेत 5G तंत्रज्ञानाचे परिक्षण सफल बनवले आहे. अमेरिकेतील सॅन डियागोमध्ये झालेल्या एका व्हर्च्युअल इव्हेंटमध्ये ही घोषणा करण्यात आली. रिलायन्स जिओचे अध्यक्ष मॅथ्यू ओमान यांनी क्वालकॉम इव्हेंटमध्ये रिलायन्सची उपकंपनी रेडीसिससह मिळून 5G तंत्रज्ञानावर काम करत असल्याचे सांगितले. भारतात याची लवकरात लवकर घोषणा केली जाणार असून जिओच्या याच पावलामुळे चीनी कंपनी हुवावेला जगभरात टक्कर मिळू शकणार आहे.
 
 
 
1Gbps स्पीड मिळणार
 
जिओ 5G आणि क्वालकॉमतर्फे करण्यात आलेल्या घोषणेत जियो 5GNR सॉल्यूशन्स आणि क्वालकॉम 5G RAN या मंचावर 1 Gbps पेक्षा जास्त स्पीड मिळत आहे, असे सांगण्यात आले आहे. जगभरात अमेरिका, साऊथ कोरिया, ऑस्ट्रेलिया, स्विट्जरलँड आणि जर्मनी देशांतील ग्राहकांना 1Gbps इंटरनेट स्पीड मिळत आहे. लवकरच ही सुविधा भारतात मिळत आहे.
 
 
हुवावेवर प्रतिबंध
 
कोरोना विषाणूमुळे अनेक देशांनी चीनी कंपनी असलेल्या हुवावेवर प्रतिबंध लावण्यात आला आहे. हुवावे 5G तंत्रज्ञान विकसित करणारी कंपनी आहे. रिलायन्स जिओच्या या सफल परिक्षणानंतर जगभरात याला टक्कर दिली जाऊ शकते. रिलायन्स जिओ 5G ला याद्वारे जगभरात आपली पाळेमुळे घट्ट रोवण्याची संधी आहे. 
 
 
कुठे मिळतेय 5G सेवा
 
दक्षिण कोरिया, चीन आणि यूनायटेड स्टेट्समध्ये सर्वात आधी 5G सेवा सुरू करण्यात आली होती. भारतातही आता 5G सेवा टेस्टींग सुरू आहे. यापूर्वीच जगातील ६८ देशांमध्ये ही सेवा सुरू करण्यात आली आहे. श्रीलंका, ओमन, फिलीपिन्स, न्युझीलंडमध्येही ही सेवा उपलब्ध आहे. जिओ 5G सेवा सुरू झाल्यानंतर भारताचाही या यादीत सामावेश होईल. 
 
 
5G सेवा देणाऱ्या कंपन्या कोणत्या ?
 
 
जगभरात आता 5G ऑपरेटर्सच्या यादीत कित्येक कंपन्यांचा सामावेश आहे. AT&T, केटी कॉर्पोरेशन आणि चाइना मोबाइल या कंपन्यांनी 5G सेवा सुरू केली आहे. भारतात रिलायन्स जिओ आणि एअरटेलनेही या तंत्रज्ञानावर काम सुरू केले आहे. जिओ 5G या बाबतीत इतर कंपन्यांपेक्षा आघाडीवर आहे. 
 
 
4G पेक्षाही गतीने चालणार इंटरनेट
 
5G म्हणजे 5th जनरेशन स्पीड, असे म्हटले जाते. 4G च्या तुलनेत कित्येक गतीने सेवा मिळणार आहे. इंटरनेट सेवा देणाऱ्या कंपनी ओपन सिग्नलने 5G सेवेबद्दल अहवाल सादर केला आहे. त्यानुसार जगात सर्वात जास्त डाऊनलोल स्पीड हा सौदी अरबमध्ये आहे. 5G नेटवर्कचा डाऊनलोड स्पीड हा ३७७.२ mbps इतका आहे. 4G चा डाऊनलोड स्पीड हा ३०.१ mbps इतका आहे. 5Gच्या तुलनेत हा स्पीड १२.५ टक्के कमी आहे.रिलायन्स जिओने मात्र, भारतात १ Gbps स्पीड देण्याचे आश्वासन दिले आहे.
 
 
इंटरनेट सेवा महागणार
 
भारतात अद्याप 5G सेवा सुरू झालेली नाही. सेवा सुरू झाल्यानंतर या प्लान डिटेल्सही मिळणार आहे. निश्चितच या प्लान्सचे दर हे 4Gच्या तुलनेत महागडे असणार आहेत. तसेच 5G सेवा ही 4G च्या तुलनेत दहा पटींनी महागडी असणार आहे. उदा. २८ दिवसांची वैधता असणारा 4G डेटाप्लान १९९ रुपये आहे तर 5G प्लानची किंमत ही तब्बल १५०० रुपये इतकी असू शकते. मात्र, सुरुवातीला टेलिकॉम कंपन्यांकडून काही ऑफर्सही दिल्या जाऊ शकतात.



@@AUTHORINFO_V1@@