संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक दादा प्रधान यांना देवाज्ञा

21 Oct 2020 15:00:38

Dada Pradhan_1  
 
 
मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक दत्तात्रय वामन प्रधान उर्फ दादा प्रधान यांना बुधवार दिनांक २१ ऑक्टोबर रोजी पहाटे ३ वाजता देवाज्ञा झाली. त्यांचे वय ९२ वर्ष होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्त्ये म्हणून ते अनेक वर्ष विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. कोविड सुरू होई पर्यंत ते रोज शाखेत हजर असत.
 
 
दादा प्रधान यांनी चेंबूर भाग कार्यवाह, घाटकोपर विभाग कार्यवाह, चेंबूर भाग संघचालक, चेंबूरमधल्या अनेक शिक्षण संस्थेचे संचालक सदस्य, चेंबूर एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष, हनमान मंदिर ट्रस्ट संचालक, इतिहास संकलन समिती अशा अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या. बुधवारी सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या आत्म्यास सद्गती प्राप्त होवो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना.
 
 
Powered By Sangraha 9.0