“सुडाच्या राजकारणासाठी बक्कळ पैसा, पण शेतकऱ्यांसाठी नाही”

21 Oct 2020 13:16:56

Atul Bhatkhlkar_1 &n
 
मुंबई : सध्या ओल्या दुष्काळामुळे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये शेतकरी रडकुंडीला आला आहे. यावर आता विरोधीपक्ष नेत्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. “अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात खटला चालवण्यासाठी कपिल सिब्बलना प्रत्येक सुनावणीसाठी १० लाख रुपये. पण,शेतकऱ्यांसाठी एक रुपयाही नाही. ” असा आरोप भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर केला आहे.
 
 
 
 
 
 
“अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात खटला चालवण्यासाठी कपिल सिब्बलना प्रत्येक सुनावणीसाठी १० लाख रुपये. सूडाच्या राजकारणासाठी ठाकरे सरकारकडे बक्कळ पैसा आहे, पण शेतकऱ्यासाठी नाही. सत्तेवर बसलेल्या मूठभर लोकांचे हितसंबंध जपण्यासाठी हे सरकार काम करते आहे. जनता वाऱ्यावर सोडली आहे.” असे ट्विट करत अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर सडकून टीका केली आहे.
 
 
 
 
 
 
 
राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. भाजपने आक्रमक होऊन शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्याची मागणी केली आहे. परंतु अद्यापही राज्यसरकारने शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केली नसल्याने, भाजपची राज्य सरकार वर टीका सुरू आहे. त्यातच भाजपने कपिल सिब्बल यांना दिलेल्या मानधनामुळे राज्य सरकारला कोंडीत पकडले आहे. सध्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक भाजप नेते पूरग्रस्त जिल्ह्यांना भेट देत आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0