“लॉकडाऊन संपला असला तरी कोरोना नाही”

20 Oct 2020 18:40:40

PM Modi_1  H x
 
 
नवी दिल्ली : नवरात्री, दसरा, दिवाळीसारखे भारतीयांचे महत्त्वाचे सण जवळ आले असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गाफील न राहण्यचे आवाहन केले आहे. ““सणासुदीच्या या दिवसांमध्ये बाजारातसुद्धा अनेक दिवसांनी उत्साह दिसत आहे. पण विसरू नका, लॉकडाऊन संपला असला तरी कोरोना विषाणू गेलेला नाही.” असा संदेश मंगळवारी पंतप्रधानांनी जनतेला दिला.
 
 
 
“कोरोना विरोधातील लढाई जनता कर्फ्यूपासून आजपर्यंत आपण खूप मोठा प्रवास केला आहे. वेळेनुसार आर्थिक गाडा हळु-हळू पुर्ववत येत आहे. आपल्यातील अनेकजण आयुष्य रुळावर आणण्यासाठी घराबाहेर पडत आहेत. गेल्या सात-आठ महिन्यांत प्रत्येक भारतीयांच्या प्रयत्नांमुळे भारत आज ज्या चांगल्या स्थितीत आहे त्या परिस्थितीला खराब होऊ देऊ नका.” असा सल्लादेखील संन्या जनतेसाठी दिला.
 
 
“जोपर्यंत या विषाणूवर लस येत नाही, तोपर्यंत आपला लढा बंद करून चालणार नाही. अनेक देश लशीसाठी प्रयत्न करत आहेत. आपल्या देशातले वैज्ञानिकही जीवाची बाजी लावून युद्ध पातळीवर संशोधन करत आहेत. कोरोनावरील लस जेव्हा येईल, तेव्हा ती लवकरात लवकर प्रत्येत भारतीयापर्यंत कशी पोहोचेल यासाठीसुद्धा सरकार प्रयत्न करत आहे,” असे पंतप्रधानांनी जनतेला सांगितले.
 
 
“हा कोरोना विषाणू पसरू नये यासाठी खबरदारी घ्यावी लागेल. बेफिकीर होण्याची ही वेळ नाही. कोरोना गेला असे समूज नका. कोरोनाचा धोका अजूनही कायम आहे. काही देशांमध्ये कोरोनाची प्रकाराने कमी झालेली दिसली आणि नंतर पुन्हा वाढली, अशी उदाहरणे आहेत. त्यामुळे ही वेळ निष्काळजीपणाची नाही. बेजबादार लोक स्वतःबरोबर कुटुंबालाही धोक्यात टाकतात.” असा संदेशदेखील पंतप्रधान मोदींनी जनतेला दिला.
 
 
 
Powered By Sangraha 9.0