महाराष्ट्रात 'दिशा कायदा' कधी लागू होणार : चित्रा वाघ

02 Oct 2020 18:26:51
Chitra Wagh_1  
 

राज्य विरुद्ध राज्य, असा संघर्ष उभा करणाऱ्यांना शरम वाटायला हवी ! 

मुंबई : महाराष्ट्रात दिशा कायदा कधी लागू होणार, असा प्रश्न भाजप नेत्यांतर्फे विचारला जात आहे. उत्तर प्रदेशमध्ये हाथरस प्रकरणावरून योगी सरकारविरोधात आक्रोश करणारे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या राजकर्त्यांना भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी थेट प्रश्न ठाकरे सरकारला विचारला आहे. राज्यात दिशा कायद्याची घोषणा झाल्यानंतर किती दिवस उलटून गेले. महिलांच्या नावे राजकारण करणारे, गळे काढणारे नेते स्वतःच्या राज्यात नाकर्ते का ठरत आहेत, असा थेट प्रश्न त्यांनी विचारला आहे.
 
 
 
राज्यातील सत्ताधारी हाथरस बलात्कार प्रकरणाला राज्य विरूद्ध राज्य असा प्रश्न बनवत आहेत, त्यांना या गोष्टीची शरम वाटायला हवी. उत्तर प्रदेशात झालेल्या घटनेतील आरोपींविरोधात कठोर कारवाई व्हायलाच हवी. मात्र, जो महाराष्ट्र जिजाऊंचा, रमाईचा महाराष्ट्र मानला जातो, तिथे होणाऱ्या बलात्कारांबद्दल तुम्ही बोलणार का ?, असा आक्रमक सवाल त्यांनी विचारला आहे.
 
 
 
राज्यात क्वारंटाईन सेंटरमध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचाही मुद्दा त्यांनी उजेडात आणला आहे. लॉकडाऊनमध्ये क्वारंटाईन सेंटरमध्ये दोन बलात्कार आणि १२ विनयभंगाचे गुन्हे दाखल झाले आहेत, त्याची माहिती उपस्थित करत त्यांनी सरकारला प्रश्न विचारला आहे. राज्य सरकारच्या या उदानसीतेबद्दल तुम्ही काय बोलणार आहात का?
 
 
राज्याच्या महिला बाल कल्याण मंत्री म्हणतात, राज्यात घाईघाईने दिशा कायदा लागू करायचा नाही. परंतू मग लागू करणार तरी कधी. राज्यातील इतर निर्णय जसे तातडीने घेतले जातात, तसे महिलांच्या बाबतीतील हे मुद्दे मांडण्यास मंत्र्यांना विसर का पडतो. राज्यात देशातील या पार्श्वभूमीवर दिशा कायदा लागू झाला नाही तर राज्यभर तीव्र आंदोलन करून मंत्र्यांच्या गाड्या अडवणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. महिला अत्याचार रोखण्यावर कुणीच बोलत नाही. इतरांकडे बोट दाखवून प्रश्न सुटणार आहेत का ?, असेही त्या म्हणाल्या.
Powered By Sangraha 9.0