ड्रग्स प्रकरणात बॉलीवूडमधील पूर्व मेकअप मॅन अटकेत

02 Oct 2020 18:31:33

Drugs_1  H x W:
 
मुंबई : गेले काही दिवस बॉलीवूडचे ड्रग्स कनेक्शनसंबधी एनसीबीने अनेक कारवाया केल्या. यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांची नावे पुढे आली. दीपिका, सारा, श्रद्धा आणि राकुलप्रीत सारख्या मोठ्या कलाकारांची कसून चौकशी करण्यात आली. दरम्यान मुंबईत गांजा आणि एमडीचा मोठ्या प्रमाणावर काळाबाजार केला जातो, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. शुक्रवारी सुमारे १०५ ग्रॅमचा 'एमडी' ड्रग्ससह दोघांना बोरिवली युनिटच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. यातील एक आरोपी हा बॉलिवूडमध्ये पूर्वी मेकअपमन म्हणून काम करत असल्याची माहिती देण्यात येत आहे.
 
 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघांकडून पोलिसांनी १०५ ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज जप्त केले आहे. त्याची किंमत 3 लाख २० हजार रुपये एवढी आहे. अटकेनंतर या दोघांनाही पोलीस कोठडीत ठेवले असून, न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. बोरिवली येथे काहीजण एमडी ड्रग्जची विक्रीसाठी येणार असल्याची माहिती युनिट ११च्या अधिकार्यां ना मिळाली होती. त्यानंतर त्यांनी सापळा रचत यांना अटक केली.
 
 
Powered By Sangraha 9.0