काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांना कोरोना

16 Oct 2020 16:24:33
Gulam Nabi Azad_1 &n



ट्विट करून संपर्कात आलेल्यांना क्वारंटाईन होण्याची केली विनंती

नवी दिल्ली : राज्यसभेतील विरोधी पक्षातील ज्येष्ठ काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करत ही माहिती दिली. संपर्कात आलेल्या सर्वांना चाचणी करुन काही दिवस क्वारंटाईन राहण्याची विनंती त्यांनी केली आहे.
 
 
ट्विट करत ते म्हणाले, "मी कोरोना पॉझिटीव्ह आढळलो आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी टेस्ट करून आवश्यक प्रोटोकॉलचे पालन करावे." गुलाम नबी आझाद हे घरीच विलगीकरण कक्षात राहतील, तिथेच त्यांच्यावर उपचार केले जाणार आहेत. त्यांची प्रकृती ठीक व्हावी यासाठी त्यांच्या समर्थकांनी संदेश पाठवले आहेत.
 
 
 
गेल्या काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे आणखी एक नेते कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. पंजाबचे आरोग्य मंत्री बलबीर सिंह सिद्धू यांना ६ ऑक्टोबर रोजी कोरोना विषाणूची लागण झाली होती. राहुल गांधींसह त्यांनी एका कार्यक्रमात सहभाग घेतला होता.
 
 
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार सिद्धु यांची प्रकृती ठिक आहेत. त्यांच्यावर घरीच उपचार केले जात आहे. ५ ऑक्टोबर रोजी खेती बचाओ यात्रेदरम्यान, संगरुर येथे कृषी विधेयक कायद्याच्या विरोधात प्रदर्शनात ते सहभागी झाले होते.
Powered By Sangraha 9.0