'अटल'नंतर आता 'जोजिला टनेल' ; नितीन गडकरी करणार सुरुंगस्फोट

15 Oct 2020 11:30:59

shrinagar_1  H



नवी दिल्ली :
देशाला महत्वाचा अटल टनेल मिळाल्यानंतर आता केंद्र सरकार देशाहितासाठी आणि संरक्षणासाठी महत्वाचा असलेला आणखी एक बोगदा निर्माण प्रक्रिया सुरु करणार आहे. यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे पहिला सुरुंग स्फोट करणार आहेत. भारतीय सैन्य आणि सिव्हिल इंजिनीअरची टीम जोजिलाच्या दरीला पोखरून बोगदा बनविणार आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट करून याची माहिती दिली आहे.




केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा बोगदा बनविल्यानंतर श्रीनगर, द्रास, कारगिल आणि लेहच्या भागात कोणत्याही सिझनमध्ये वाहतूक सुरु राहणार आहे. तसेच प्रवासाचा वेळही सव्वा तीन तासांनी कमी होणार आहे. हा टनेल बनल्यानंतर भू स्खलनाची भीती दूर होणार आहे. यामुळे श्रीनगर ते लेह हा प्रवास राष्ट्रीय हायवेवरून कोणत्याही धोक्याशिवाय करता येणार आहे. या प्रकल्पांतर्गत १४.१५ किमीची लांब टनेल बनविली जाणार आहे. शिवाय १८.६३ किमी लांबीचा अॅप्रोच रोडदेखील तयार केला जाणार आहे. या प्रकल्पातून ३२.७८ किमी लांबीचा रस्ता बनविला जाणार आहे. या प्रकल्पासाठी ६८०८.६३ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. बोगद्याच्या निर्माणासाठी ६ वर्षांचा वेळ लागणार आहे. तर अॅप्रोच रोड बनविण्यासाठी २.५ वर्षे लागणार आहेत. दोन्ही कामे एकाचवेळी करण्यात येणार आहेत.


Powered By Sangraha 9.0