मुंबईतून काळविटाची तस्करी उघड

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Oct-2020
Total Views |
blackbuck_1  H


या प्रकरणी एका आरोपीला अटक 

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई पोलीसांच्या गुन्हे शाखेने घाटकोपरमधून काळविटाच्या कातड्याची तस्करी उघडकीस आणली आहे. याप्रकरणी अंधेरी-घाटकोपर लिंक रोडवरील एका बस थांब्यावरुन आरोपीस अटक करण्यात आली आहे. विक्रीच्या उद्देशाने आरोपी काळविटाच्या कातड्याची तस्कर करत होता. 
  
 
मुंबई गुन्हे शाखेच्या घाटकोपर युनिटचे पोलीस निरीक्षक मनीष श्रीधनकर यांना एक इसम घाटकोपर पूर्वेला वन्यप्राण्याची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार बुधवारी संध्याकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास अंधेरी-घाटकोपर लिंक रोडवरील बस स्टाॅपवर सापळा लावण्यात आला. याठिकाणी आलेल्या एका इसमाच्या पाठीवर काळ्या रंगाची बॅग पोलीसांच्या नजरेस पडली. या बॅगेची तपासणी केली असता, त्यामध्ये एका पांढऱ्या रंगाच्या प्लास्टिकच्या गोणपाटामध्ये काळवीटाचे कातडे सापडले. या कातड्याला शिंग जोडलेली होती. 
 
 
याप्रकरणी ताब्यात घेतलेल्या इसमाकडे कातड्याबाबत चौकशी केली असता, त्याच्याकडे कातडे बाळगण्याबाबत कोणताही परवाना नव्हता. साथीदारांच्या मदतीने कातड्याची वाहतूक करुन विक्री करता आणल्याची कबुली त्याने दिली. त्यानुसार आरोपीला पंतनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 

@@AUTHORINFO_V1@@