राज्यातील आयडिया व्होडाफोनचे नेटवर्क गुल

15 Oct 2020 16:24:46

VI_1  H x W: 0



मुंबई :
मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रात कालपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यातच सकाळपासून नेटवर्क गेल्याने व्होडाफोन- आयडीयाची नवीन नावाची कंपनी व्हीआयचे नेटवर्क गेल्याचा अनुभव अनेकांना आला. ग्राहकांनी केलेल्या प्रश्नांच्या भडीमारावर कंपनीने नेटवर्क पूर्ववत करण्यासाठी किमान सहा तास लागतील, असे म्हटले आहे.


पुण्यातील काही ग्राहकांनी कालपासूनच कंपनीकडे तक्रार केल्या आहेत. मात्र, त्यांना कंपनीने लवकरच सुरु केले जाईल, तांत्रिक अडचण असल्याचे उत्तर दिले आहे. कंपनीने याबाबत दिलगिरी व्यक्त केली असून ग्राहकांनी संयम ठेवावा, असे आव्हान वोडाफोनकडून करण्यात आले आहे.मात्र, आज दुपारपर्यंत त्या ग्राहकांना नेटवर्कची वाट पहावी लागली आहे.पुण्याप्रमाणे नागपूरमध्येही नेटवर्क नसल्याचे सांगितले जात आहे. मुंबईशेजारील अंबरनाथ, बदलापूर येथील देखील व्होडाफोन कंपनीची रेंज मिळत नाहीय. अनेकांचे फोन लागत नसल्याच्या तक्रारी सुरु आहेत. याचबरोबर अमरावतीयेथील आयडिया ग्राहकांना देखील कालपासून रेंजची समस्या जाणवू लागली आहे. कंपनीकडूनही ग्राहकांना काही ठोस उत्तर मिळत नसल्याने #vodafoneindia हा हॅशटॅग ट्रेंडिंगवर आहे.


दरम्यान, वोडाफोन आयडियाने नेटवर्क इश्यू झाल्याचे मान्य केले आहे. त्यावर काम सुरु असून किमान पाच ते सहा तासांचा अवधी लागेल, असे कंपनीने म्हटलं आहे. ग्राहकांनी केलेल्या प्रश्नांच्या भडीमारावर कंपनीने नेटवर्क पूर्ववत करण्यासाठी किमान सहा तास लागतील, असे म्हटलं आहे. बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी नेटवर्कमध्ये बिघाड झाल्याचे कंपनीने म्हटलं आहे. पुणे, मुंबई यासह राज्यातील इतर महानगरांमध्ये वोडाफोन ग्राहकांचा संपर्क तुटला आहे.
परिक्षार्थिंची मोठी अडचण
सध्या राजभरातील विविध विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा सुरू आहेत. तसेच शाळांच्या अर्ध वार्षिक परीक्षा सुरू आहेत. व्होडाफोनच्या नेटवर्क समस्येमुळे ऑनलाईन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत. काही ठिकाणी व्होडाफोन मिनी स्टोअर समोर लोकांची गर्दी झाली आहे. याचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Powered By Sangraha 9.0