मुंबईत तुंबणाऱ्या पाण्याबाबत गडकरींनी लिहिले मुख्यमंत्र्यांना पत्र

14 Oct 2020 18:09:44

Gadkari_1  H x
 
 
मुंबई : पावसाळ्यामध्ये अनेकवेळा मुंबईची तुंबई होते. मागील पावसातदेखील असाच काहीसा प्रकार मुंबईमध्ये घडला. आता यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीदेखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह इतर महाविकास आघाडीच्या नेत्र्यांना पत्र लिहिले आहे. मुंबईतील ही पूर समस्या सोडवण्यासाठी राज्य सरकाने प्रयत्न करावेत, असे या पत्रात म्हंटले आहे. याशिवाय मुंबईत जागोजागी पाणी तुंबल्याने वित्तहानी, इमारीतींची समस्या, रस्त्यांचे नुकसान तर होतेच, तसेच अनेक मुंबईकरांना यामध्ये जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे याबाबत योग्य कार्यवाही करून मुंबईकरांना दिलासा द्यावा, अशी मागणी नितीन गडकरी यांनी केली आहे.
 
 
“मुंबईतील ड्रेनेज वॉटरच्या पाण्याचे योग्य नियोजन करावे. मुंबईत ड्रेनेज वॉटर आणि गटरलाईनच्या पाण्यावर प्रक्रिया करुन त्याचा वापर करण्यात यावा,” असा सल्ला त्यांनी पत्रातून दिला आहे. तसेच, “मुंबईत दरवर्षी पुरामुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. पूर येऊन गेल्यानंतर शासनाला स्वच्छता, आरोग्य सेवा पुरवणे अशी कामे करावी लागतात. या काळात मालमत्तांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर होते त्याच्या दुरुस्तीकडे लक्ष देता येत नाही, मात्र, रस्ते तातडीने दुरुस्त करावे लागतात.” असेदेखली गडकरींनी यावेळी सांगतिले.
 
 
पुढे नितीन गडकरी यांनी “मुंबईतील सर्व रस्ते सिमेंट कॉंक्रिटचे करणे गरजेचे आहे. तसेच तुंबणाऱ्या पाण्याचा वापर शेती आणि उद्योगासाठी कसा शक्य होईल याचा विचार करावा. त्याचप्रमाणे तुंबणारे पाणी शुद्धीकरण करून धरणात साठवता येऊ शकते. त्यामुळे अनेक ठिकाणचा पाण्याचा प्रश्न सुटेल. तर, प्रक्रिया करून धरणात साठवलेलेल पाणी ठाणे, नाशिक, नगर अशा जिल्ह्यांकडे वळवणे.” अशा मुद्द्यांवर राज्य सरकारने विचार करावा असा सल्ला दिला आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0