राज्यपालांच्या हिंदुत्व शब्दाला शिवसेनेचाच आक्षेप!

13 Oct 2020 14:03:14
CM _1  H x W: 0




पत्राद्वारे रंगला 'सामना'

 
 
मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मंदिरे सुरू करण्यासाठी खरमरीत पत्र लिहीले आहे. यासोबतच त्यांनी शिवसेनेच्या हिंदूत्ववादी भूमीकेचीही आठवण करून दिली. हिंदुत्वाचा प्रचार करणारी शिवसेना अनलॉक प्रक्रीयेवरून आडकाठी का घालत आहे, असा जाबही सरकारला विचारला होता. मंगळवारी या संदर्भात भाजपने मदिरा खुली झाली मग मंदिरे बंद का, असा प्रश्न विचारत आंदोलन केले होते. 
 
 
याच दरम्यान, मुख्यमंत्र्यांना राज्यपालांचे पत्र मिळाले. सरकारने देवस्थाने खुली करावीत, अशी सूचना दिली होती. मात्र, त्यात त्यांनी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वाचा उल्लेख वर्मी घाव लागला. राज्यपाल पद हे धर्मनिरपेक्ष आहे. त्यांनी धर्मनिरपेक्ष घटनेची शपथ घेऊन त्यांनी पदभार स्वीकारला आहे. राज्यपालांनी केवळ घटनेनुसार राज्य सरकार चालते का हे पाहणे त्यांचे काम आहे, त्यांनी तेच करावे, असे उत्तर शिवसेनेतर्फे देण्यात आले आहे. खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणी प्रसिद्धी माध्यमांना प्रतिक्रीया दिली. हिंदूत्व नाकारले नाही ना हिंदूत्व विसरलो, असे राऊत म्हणाले.
 
 
 
केवळ हिंदूत्व हा शब्द वापरल्याने खडबडून जाग आलेल्या शिवसेना नेत्यांनी या प्रकरणी प्रतिक्रीया देण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही राज्यपालांना उत्तर दिले आहे. आम्हाला हिंदूत्व शिकवण्याची गरज नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. अनलॉकच्या प्रक्रीयेबद्दल राज्यपालांनी बोलू नये, असेही ठाकरे म्हणाले आहेत.


Powered By Sangraha 9.0