घृणास्पद ! विद्यार्थीनीवर सामुहिक बलात्कार

13 Oct 2020 11:09:48
rape_1  H x W:

 

झारखंड - गुमला येथील घटना

नवी दिल्ली : झारखंड राज्यातील गुमाला येथे पाचवीत शिकत असलेल्या विद्यार्थीनीवर पाच मुलांनी रात्रभर सामुहिक बलात्कार केल्याचा घृणास्पद प्रकार उघडकीस आला आहे. आरोपी मुलीला घरातून उचलून घेऊन गेले होते. ही घटना शनिवारी रात्री उशीरा घडली आहे. रविवारी या प्रकरणात दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
 
 
 
या घटनेचा खुलासा झाल्यानंतर पीडित मुलीचे आई-वडिलांनी दोन आरोपींना मारहाण केली. आरोपींचे हात पाय कापण्याचा प्रयत्न केला. दोघेही जेव्हा रुग्णालयात भरती झाले तेव्हा या प्रकरणाचा खुलासा झाला. पोलीसांनी या पाचही जणांना अटक केली आहे.
 
 
 
ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर गावात एक पंचायत झाली होती. त्यात आरोपींच्या कुटूंबियांनी खटला किंवा तक्रार दाखल करू नये यासाठी पीडितेच्या आई-वडिलांवर दबाव टाकला. मुलीला जीवे मारण्याची आणि तिचे घर जाळून टाकण्याची धमकी दिली. या प्रकरणी एसडीपीओ कुलदीप कुमार मंगळवारी दुपारी पत्रकार परिषद घेणार आहेत.
 
 
दोन समाजामध्ये तेढ ?
 
पीडित आणि आरोपी दोन्ही वेगवेगळ्या समाजाचे असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर दोन्ही समाजात तणावाचे वातावरण आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत पोलीसांनी गावात बंदोबस्त वाढवला आहे. परिस्थिती आता नियंत्रणात आहे, अशी माहिती पोलीसांनी दिली आहे. पीडितेच्या आई-वडिलांनी आरोपींवर धारदार शस्त्राने हल्ला केला, असा आरोप त्यांच्या कुटूंबियांनी केला आहे.



Powered By Sangraha 9.0