तनिष्क जाहिरात वाद : लव जिहादच्या समर्थनाचा आरोप

13 Oct 2020 20:01:48

Tanishq_1  H x
 
 
मुंबई : टाटा ग्रुपचे प्रसिद्ध ज्वेलरी ब्रँड तनिष्क आपल्या नवीन जाहिरातीसाठी वादात सापडले आहे. ब्रँडला सोशल मीडियावर टीकेचा सामना करावा लागत आहे. उत्सवाच्या काळात तनिष्कने आपल्या प्रमोशनसाठी नवीन जाहीरात जारी केली आहे. यामध्ये आंतरजातीय विवाहसंदर्भातील कथेचा आधार घेतला आहे. जाहिरातीमध्ये हिंदू मुलीची मुस्लिम मुलासोबत लग्न दाखवण्यात आले आहे. यानंतर ट्विटरवर #BoycottTanishq सोबतच ज्वेलरी ब्रँडचा विरोध केला जात आहे. यानंतर तनिष्कने युट्युबवरून काढून टाकली आहे.
 
 
तनिष्कच्या या जाहिरातीमध्ये एका हिंदू मुलीला मुस्लिम कुटुंबाच्या सूनेच्या रुपात दाखवण्यात आले आहे. हिंदू मुलीचे मुस्लिम घरात लग्न झाले आहे आणि तिच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम दाखवण्यात आला आहे. यामध्ये हिंदू संस्कृती लक्षात घेता मुस्लिम कुटुंब सर्व प्रथा-परंपरा हिंदू धर्मानुसार करत आहे. जाहिरातीच्या शेवटी ती प्रग्नेंट महिला आपल्या सासूला विचारते, “आई ही प्रथा तर तुमच्या घरात नसते ना?” यावर तिची सासू उत्तर देते की, “पण मुलीला खूश करण्याची प्रथा तर सर्वच घरात असते ना?” 
 
 
ही जाहिरात ट्विटरवर वायरल होताच चर्चेचा विषय बनली आणि टीकेचा वर्षाव सुरु झाला. काहींनी याला लव्ह जिहादला प्रोत्साहन देणारी बाब तर कोणी हिंदूविरोधी असल्याचे म्हणत आहेत. 'एकत्वम'च्या नावाने तयार करण्यात आलेल्या या जाहीरातीवर अनेकांनी आक्षेप घेत लव्ह-जिहादला प्रोत्साहन देणारे म्हटले आहे. ट्विटरवर तनिष्कच्या विरोधात मोहिम सुरू झाली आणि लोक तनिष्कचे दागिणे खरेदी करु नका असे म्हणत याला बायकॉट करण्याची मागणी करत आहेत. काही कलाकारांनी या जाहिरातीचे समर्थन ही केले आहे. 
 
 
 
Powered By Sangraha 9.0