न्याय नाही तोपर्यंत अस्थी विसर्जन नाही : हाथरस पीडितेचे कुटंब

13 Oct 2020 12:15:07
Hathras case _1 &nbs
 
 

हाथरस बलात्कार प्रकरण

लखनऊ : हाथरस पीडितेचे कुटूंब सोमवारी रात्री ११ वाजता लखनऊला परतले. उच्च न्यायालयात लखनऊ खंडपीठासमोर सुनावणी झाल्यानंतर पीडितेचे कुटूंबिय सायंकाळी साडेचार वाजता निघाले. रस्त्यात कडक सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. गावात कुटूंबियांची वाट पाहिली जात होती. प्रसार माध्यमांनी त्यांच्या गाडीला घेराव घातला.
 
 
 
पीडितेच्या वडिलांनी सांगितले की, न्यायालयात सर्वजण इंग्रजीत बोलत होते. त्यामुळे समजले नाही की काय सुरू आहे. मात्र, हे समजले की डीएम साहेबांनी सुनवण्यात आले होते. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत माझ्या मुलीच्या अस्थींचे विसर्जन करणार नाही, असे त्यांनी सांगितले.
 
 
 
एक तास सुनावणी होती सुरू
 
पीडित कुटूंबियांच्या मते, न्यायाधीशांच्या समोर एक तास सुनावणी सुरू होती. न्यायालयाने अंतिम संस्कार करण्याबद्दल प्रश्न विचारला, त्यावेळी घडला प्रकार सांगण्यात आला. अंतिम संस्काराची परवानगी दिली होती का या प्रश्नावर पीडितेच्या वडिलांनी नाही, असे म्हटल्यावर पोलीस अधिकाऱ्यांना न्यायाधीशांनी सुनावले. सर्वजण इंग्रजीत बोलत होते. जे आम्हाला समजले नाही ते आम्हाला हिंदीतून सांगत होते.
 
 
हाथरसमध्ये १४ सप्टेंबर रोजी चार जणांनी १९ वर्षीय मुलीवर सामुहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. पाठीचे हाड मोडल्याचे आणि जीभ कापल्याचाही आरोप त्यांच्यावर आहे. दिल्लीत २९ सप्टेंबर रोजी पीडितेचा मृत्यू झाल्यावर चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, पोलीसांचा दावा आहे की पीडितेसोबत कुठलेही दुष्कर्म झालेले नाही.




 
Powered By Sangraha 9.0