वृत्तवाहिन्यांविरोधात बड्या निर्मात्यांची उच्च न्यायालयात धाव

13 Oct 2020 13:45:48

Republic_1  H x
 
 
 
नवी दिल्ली : अभिनेता सुशांतसिंग आत्महत्या प्रकरण, बॉलीवूड ड्रग्स कनेक्शन अशा अनेक बातम्यांचा लेखाजोखा मांडणाऱ्या वृत्तवाहिन्यांविरोधात तब्बल ३४ निर्मात्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यामध्ये करण जोहर, यशराज, आमिर खान, शाहरूख खान आणि सलमान खान यांच्या प्रोडक्शन कंपन्या, चार फिल्म इंडस्ट्री असोसिएशन आणि ३४ निर्मात्यांनी ही याचिका दाखल केली आहे. बेजबाबदार आणि अपमानजनक टिप्पणी करण्यापासून संबंधित वृत्तवाहिन्यांना रोखण्यात यावे अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.
 
 
काही वृत्तवाहिन्यांमध्ये बॉलीवूडविरोधात बदनामीची मोहीम चालवण्यात आल्याची तक्रार करत चार बॉलीवूड असोसिएशन आणि ३४ बॉलीवूड निर्मात्यांनी यावर आक्षेप घेतला आहे. संबंधित वृत्तवाहिन्यांमध्ये बॉलीवूडमधील कलाकारांविरोधात मीडिया ट्रायल सुरू असून अशा ट्रायलना पायबंद घालण्यात यावा, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. यापूर्वीही सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या तपासाप्रकरणी बॉलीवूडच्या निर्मात्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात काही वृत्तवाहिन्याच्या बेजबाबदार पत्रकारिताविरोधात खटला दाखल केला आहे. हा खटला रिपब्लिक टीव्हीचे अर्णब गोस्वामी आणि प्रदीप भंडारी, तसेच इतर वृत्तवाहिन्या आणि त्यांच्या प्रतिनिधींविरोधात दाखल करण्यात आला आहे.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0