उद्धव ठाकरे सरकारला सुबुद्धी दे देवा

13 Oct 2020 17:47:08

BJP_1  H x W: 0
 
 
कल्याण : सरकारने बार उघडे केले आहेत. मात्र मंदिरांची दारे बंदच ठेवली आहेत. बारमुळे कोरोना पसरत नाही. मात्र मंदीरामुळे कोरोना पसरतो असा या सरकाराचा समज आहे. त्यामुळे गणपती बाप्पा उद्धव ठाकरे सरकाला सुबुद्धी दे असे साकडे डोंबिवलीतील गणेश मंदिरात भाजप आमदार व माजी राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी भाजप पदाधिकाऱ्यांसोबत घातले आहे.
 
 
गणोश मंदिरात मंगळवारी भाजपच्या वतीने ठाकरे सरकारच्या विरोधात घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, डोंबिवली पूर्व-पश्चिम मंडळ अध्यक्ष, महिला आघाडीच्या कार्यकत्र्या आदी उपस्थित होते. या सरकारकडे समस्या मांडण्यासाठी व्यासपीठच नाही. त्यामुळे भाजप विविध समस्याप्रकरणी सरकारचे लक्ष्य वेधण्याकरीता लोकशाही मार्गाने आंदोलने करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून घंटानाद हे आंदोलन करण्यात आले आहे. केवळ हिंदूत्वाचा पूळका आणायचा. मात्र हिंदूंची मंदिरे कोरोनाच्या नावाखाली देवदर्शनाकरीता खुली न करता बंद ठेवायची असा आरोपही चव्हाण यांनी केला आहे.
 
 
कल्याण पूव्रेत देखील भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली भाजपा पदाधिका:यांनी तिसगाव येथील जरीमरी देवी मंदिरासमोर घंटानाद करत ठिय्या आंदोलन केले. यावेळी आमदार गणपत गायकवाड यांनी सरकारने बियर बार आणि अवैध धंदे सुरू केले मात्र मंदिरे उघडली नाहीत. मंदिर आणि जिम लोकांची गरज आहे. मात्र सरकार फक्त स्वत:चे घर चालवण्यासाठी बार आणि अवैध धंदे सुरू केले असल्याचा आरोप केला आहे. तसेच यावेळी लवकरात लवकर मंदिरे उघडण्याची मागणी केली. यावेळी नगरसेवक अभिमन्यू गायकवाड, कल्याण मंडळ अध्यक्ष संजय मोरे, जरीमरी सेवा मंडळ अध्यक्ष दत्ता गायकवाड, प्रदेश राज्य परिषद सदस्य संदीप तांबे, महिला मोर्चा जिल्हाअध्यक्षा नगरसेविका रेखा चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी आदीसह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
 
 
 
Powered By Sangraha 9.0