खंडीत विजपुरवठ्यामुळे मुंबईत पाणीबाणी!

12 Oct 2020 18:35:01
tap _1  H x W:
 
 
मुंबई : विजपुरवठा खंडीत झाल्याने आधीच हैराण झालेल्या मुंबईकरांना आता पाणीबाणीचा सामना करावा लागणार आहे. मुंबई आणि उपनगरातील पाणीपुरवठ्यावर या वीज नसल्याने प्रभाव पडला आहे. मुंबई उपनगरातील अनेक पट्ट्यांत कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू आहे.



सकाळी वीज बंद झाल्याचा परिणाम पाणी पुरवठ्यावर झाला आहे. जोपर्यंत पूर्णपणे वीजपुरवठा सुरू होत नाही तोपर्यंत पाण्याची समस्या कायम राहणार असल्याचे सांगितले जात आहे. पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रशासनाने उद्या दुपारपर्यंत मुदत दिली आहे. मंगळवारी दुपारनंतर पाणी पुरवठा सुरळीत होणार आहे.
 
 
 
वीज खंडित झाल्याच्या घटनेबाबत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याशी चर्चा केली आहे. वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी अधिकारी व मंत्र्यांच्या उपस्थितीत या प्रश्नी कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी निर्णय घेण्यात आला आहे. तीनही विद्युत वाहिन्या संपूर्ण क्षमतेने सुरू करून भविष्यात अशी परिस्थिती ओढावणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0