राजमाता जयंती : मोदींनी दिला रामजन्मभूमी आंदोलन स्मृतींना उजाळा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Oct-2020
Total Views |
Narendra Modi _1 &nb
 
 
 

जन्मशताब्दीनिमित्त शंभर रुपयांचे विशेष नाणे जाहीर


नवी दिल्ली : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एका व्हर्च्युअल कार्यक्रमात राजमाता विजया राजे शिंदे यांच्या सन्मानार्थ शंभर रुपयांचे नाणे जाहीर केले आहे. त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त अर्थमंत्रालयाने हे विशेष नाणे जाहीर केले आहे. कोरोना महामारीमुळे राजमाता यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमाचे व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे (व्हर्च्युअल) आयोजन करण्यात आले होते.
 
 
 
पंतप्रधान म्हणाले, "एकता यात्रेनिमित्त राजमाता यांनी माझा परिचय गुजरातचे युवा नेता नरेंद्र मोदी म्हणून केला होता. इतक्या वर्षांनंतर तोच मी आज प्रधान सेवक म्हणून त्यांच्या अनेक स्मृतींना उजाळा देत उभा आहे. राजमाता यांनी आपले आयुष्य गरीबांसाठी समर्पित केले होते. त्यांना राजसत्तेपेक्षा जनसेवा महत्वाची होती."
 
 
 
मोदींच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे
 
नारी शक्तीच्या बद्दल उल्लेख करताना त्या म्हणत, जे हात पाळणा झुलवू शकतात ते जगावर राज्यही करू शकतात. आज भारताची नारी शक्ती प्रत्येक क्षेत्रात पुढे जात आहे, देशाला पुढे घेऊन जात आहेत. मोदी सरकारने तिेहेरी तलाक कायदा पारीत करून देशासमोर राजमाता शिंदे यांच्या महिला सशक्तीकरणाच्या दृष्टीकोन समोर ठेवला आहे. रामजन्मभूमी मंदिर निर्माणासाठी त्यांनी जो संघर्ष केला त्यांच्या जन्मशताब्दी वर्षातच त्यांचे स्वप्न पूर्ण झाले.
 
 
 
हा किती अद्भभूत योगायोग आहे. राजमाता यांच्या आशीर्वादामुळे देश आज विकासाच्या मार्गावर चालला आहे. गाव, गरीब, मागासवर्गीय, शोषित, वंचित, महिलांचा विकास देशाच्या प्रार्थमिकतेचा भाग आहे. राजमाता एक आध्यात्मिक व्यक्तित्व होत्या. साधना, उपासना, भक्ति त्यांच्या अंतर्मनात होती. ज्यावेळी त्या देवाची उपासना करत त्यावेळी भारतमातेचीही प्रतिमेची पूजा करायच्या.
 
 
 
तिहार तुरुंगात राजमाता यांनी आपल्या मुलींना पत्र लिहीले होते. त्यात त्यांनी मोठी शिकवण दिली होती. आपल्या भावी पीढीला अभिमानाने जगता आले पाहिजे. निधड्या छातीने वावरण्याच्या उद्देशाने आपल्याला संकटात धीराने जगण्याची प्रेरणा मिळते.
कुणीही साधारण व्यक्ती ज्याची योग्यता असते, प्रतिभा असते देशाची सेवा करण्याची भावना असते ती व्यक्ती लोकतंत्र आणि सत्तेला सेवेचे माध्यम बनवू शकतात. राजमाता यांनी आपल्या आयुष्यातील मोठा कालखंड तुरुंगात घालवला आहे. आणीबाणीच्या काळात त्यांनी जे जे सहन केले त्याची साक्ष देणारे बरेच लोक आपल्यात आजही आहेत.
 
 
 
विवाहापूर्वी राजमाता कुठल्या राज परिवारातील नव्हत्या. त्या एका सर्वसामान्य कुटूंबातील होत्या. मात्र, विवाहानंतर त्यांनी सर्वांना आपलेसे केले. जनसेवेची शिक्षा त्यांनी सर्वांना दिली. राजकीय दायित्वासाठी कुठल्याही खास परिवारात जन्म घेणेच गरजेचे आहे, असे नाही हे देखील त्यांनी दाखवून दिले. राजमाता यांनी आपले जीवन गाव आणि गरीबांसाठी समर्पित केले.आपण राजमाता यांच्या आयुष्यातील प्रत्येक क्षणापासून बऱ्याच गोष्टी शिकू शकतो. राजमाता आपल्या लहानातल्या लहान सहकाऱ्याशी परिचय ठेवत. सामाजिक कार्यात असणाऱ्या प्रत्येकासाठी हा आदर्श असायला हवा.
 
राष्ट्राच्या भविष्यासाठी राजमाता यांनी आपले वर्तमान समर्पित केले. देशाच्या भावी पीढीसाठी त्यांनी समाजाचे सर्वसुख त्याग केला. पद आणि प्रतिष्ठेसाठी त्यांनी कधी राजकारण केले नाही किंवा तसे जगणेही पत्करले नाही. राजकारणातील अनेक उच्च पदे त्यांच्याकडे आली. मात्र, त्या सर्व पदांचा त्यांनी विनम्रतेने नाकारले होते. अटलजी आणि आडवाणीजींनी त्यांना जनसंघाच्या अध्यक्ष होण्याचा आग्रह केला होता. मात्र, त्यांनी स्वतःला कार्यकर्ता म्हणवून घेणेच स्वीकारले होते. एकता यात्रेमध्ये विजया राजे सिंधिया यांनी माझा परिचय गुजरातचा युवा नेता म्हणून केला होता. मात्र, आज इतक्या वर्षांनी त्यांचा हा नरेंद्र देशाचा प्रधानसेवक म्हणून त्यांच्या स्मृतींना उजाळा देत तुमच्या समोर आहे.
 
 
 
विशेष कार्यक्रम
 
मध्य प्रदेशच्या विविध जिल्ह्यांमध्ये राजमाता यांच्या स्मरणार्थ कार्यक्रम आयोजित करण्यात आले. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ग्वाल्हेर आणि प्रदेश भाजप अध्यक्ष विष्णुदत्त शर्मा यांच्या भोपाळ येथील प्रदेश कार्यालयात राजमाता यांच्या जीवनावर आधारित चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन केले. 

@@AUTHORINFO_V1@@