'जाम' भारी! : पत्री पुलाच्या समस्येवर विचारला आगरी गाण्यातून जाब

11 Oct 2020 17:18:11
Kalyan_1  H x W

 
 
कल्याण : कल्याण पत्री पूल एका महिन्यात मोटरेबल होणार असा दावा कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी महिन्याभरापूर्वी केला होता. मात्र हे काम पूर्ण झालेले नाही. वाहतूक कोंडीतून कल्याणकरांची सूटका झालेली नाही. या समस्येवर भाष्य करणारे गाणो आगरी गायक कल्याणचा किशोर याने तयार केले आहे. या गायकाचा आज मनसेच्या वतीने सत्कार करण्यात आले. तसेच पत्री पूलाच्या इंजिनिअरला मनसेकडून जाब विचारण्यात आला. त्यावर इंजिनिअरकडे ठोस उत्तर नव्हते.
 
 
 
कल्याण पत्री पूलाचे काम गेल्या दोन वर्षापासून सुरु आहे. हे काम संथ गतीने सुरु आहे. सध्या सहा महीन्यापासून कोरोनामुळे रेल्वे प्रवासी वाहतूक बंद आहे. त्यामुळे सगळा वाहतूकीचा ताण कल्याण शीळ रस्त्यावर आहे. त्याच वालधूनी एफ केबीन रस्ता सिमेंट कॉन्क्रीटीकरणाच्या कामकरीता बंद ठेवण्यात आला आहे. याशिवाय कल्याण दुर्गाडी येथील सहा पदरी पूलाचे काम ही सुरु आहे. त्यामुळे कल्याण पत्री पूलावर प्रचंड वाहतूक कोंडी होते. या वाहतूक कोंडीत सामान्य नागरीक, प्रवासी, वाहन चालक अडकून पडतात.
 
या वाहतूक कोंडीचा फटका रुग्णवाहिका, अग्नीशमन दलाच्या गाडय़ांना बसतो. यावर भाष्य करणारे गाणो कल्याणच्या किशोर या गायकाने तयार केले आहे. आमच अडलंय सारं काम, आत्ता रस्ता झाला जाम हे या गीताचे बोल असून हे गाणो सोशल मिडियावर चर्चेचा विषय ठरले आहे. या गायकाचा सत्कार मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर यांनी केला. तसेच पत्रीपूलाच्या कामाच्या ठिकाणी जाऊन इंजिनिअरला जाब विचारला. तेव्हा इंजिनिअरला काहीच सांगता आले नाही. काम सुरू आहे इतकेच तो सांगू शकला.



Powered By Sangraha 9.0