तिहेरी तलाकविरुद्ध लढा देणाऱ्या सायरा बानोंचा भाजप प्रवेश

11 Oct 2020 10:25:00

Shayara Bano_1  
 
नवी दिल्ली : तिहेरी तलाक विरोधात लढा देणाऱ्या कार्यकर्त्या सायरा बानो यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. उत्तराखंडमधील देहराडूनचे प्रदेशाध्यक्ष बन्सीधर भगत आणि प्रदेश महामंत्री संघटन अजय कुमार यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपचे सदस्यत्व स्वीकारले. यावेळी ‘पक्षाने संधी दिल्यास आगामी काळामध्ये निवडणूकही लढवणार’ असे मत त्यांनी व्यक्त केले.
 
 
 
 
 
 
“जर पक्षाने मला संधी दिली, तर मी बिहारमधून भाजपसाठी राजकीय कार्याची सुरूवात करू इच्छित आहे. मी लोकांना भाजपच्या विचारधारेबद्दल सांगेन, ज्यामळे मी पक्षप्रवेश करण्यासाठी प्रेरीत झाले आहे. भाजपकडून अल्पसंख्यांकासाठी केल्या गेलेल्या कामांबद्दल मी माहिती देईन. विशेष करून मुस्लीम समाजातील महिला व उपेक्षित समाजामधील अन्य लोकांसाठी मला पक्ष जे काम सोपवेल ते मी करेन.” असे मत सायरा बानो यांनी व्यक्त केले.
 
 
“सायरा बानो यांनी तिहेरी तलाक विरोधात आवाज उठवला. अशाच प्रकारे त्या पक्षाचा सिद्धांत पुढे घेऊन जातील. विशेषकरून भविष्यात अल्पसंख्याक समाजातील महिलांपर्यंत भाजापचे विचार पोहचवण्यात त्यांचे महत्वाचे योगदान राहणार आहे.” असे मत प्रदेशाध्यक्ष बन्सीधर भगत यांनी व्यक्त केले. सायरा बानो यांची थोडक्यात माहिती द्यायची झाली तर, त्यांनी पहिल्यांदा तिहेरी तलाक, बहूपत्नीकत्व व निकाह हलालावर बंदीची मागणी केली होती. तसेच, यावरूनच २०१६ मध्ये सर्वोच्च न्यायालयात देखील धाव घेतली होती.
 
 
Powered By Sangraha 9.0