आरे कारशेड आता काजूरमार्गला : मुख्यमंत्री

11 Oct 2020 14:38:21

Uddhav Thackeray_1 &
 
 
मुंबई : रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठकरे यांनी जनतेशी सवांद साधताना आरे कारशेड संदर्भात एक धक्कादायक निर्णय घेतला. आता आरेचे मेट्रो कारशेड गुंडाळून ते कांजुरमार्गला हलवणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. “आरेचा परिसर जंगल म्हणून घोषित केल्यानंतर मेट्रो कारशेडचं काय होणार असा प्रश्न होता. पण, आता हा मेट्रो कारशेड कांजुरमार्ग इथे उभारण्यात येणार आहे. कांजुरमार्गमधील जागा ही सरकारची आहे. त्यामुळे यासाठी कोणताही खर्च येणार नाही.” असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. त्यांच्या या निर्णयावर आक्षेप घेत विरोधकांनी त्याचा निषेध केला आहे.
 
 
“कांजूरमार्गची जमीन ही सरकारी असून अगदी शून्य रुपयात ही जमीन मेट्रो कारशेडसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे. “आरेमध्ये ज्या इमारती उभ्या केल्या आहे आणि जे काम झाले आहे, त्यावर १०० कोटी खर्च झाला आहे. हा खर्च वाया जाणार नाही. त्याचा दुसऱ्या कामासाठी वापर केला जाईल.” असे निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला आहे. तसेच, आरेसाठी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवरचे सगळे गुन्हे मागे घेतले जाणार असल्याचेदेखील त्यांनी सांगितले.
 
 
 
Powered By Sangraha 9.0