हाथरसचे नक्षली कनेक्शन ?

10 Oct 2020 11:33:57

Hathras Naxal Connection_
 
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमधील हाथरसमध्ये निर्भयाप्रमाणेच मोठी बलात्काराची घटना घडली. यामध्ये विरोधी पक्ष तसेच मिडियामुळे हे प्रकरण चांगले तापले. आता याबद्दल अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. आरोपीच्या वकिलांनी हा ऑनर किलिंगचा प्रकार असून तिच्या भावानेच तिचा खून केला असल्याचे आरोप केले. त्यानंतर आता पीडितेच्या घरात असलेली वहिनी ही खोटी असून तिचा नक्षलग्रस्तांशी संबंध असल्याची माहिती समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
 
 
 
एकीकडे देशभरातील मिडिया पिडीतेच्या घरच्यांच्या मुलाखती घेत असताना दुसरीकडे ही महिला वहिनी म्हणून वावरत होती आणि कोणाला याचा थांगपत्ताच लागला नाही. ही महिला मध्य प्रदेशातील जबलपूर मधली असल्याची देण्यात आली असून सध्या या महिलेचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार एसआयटीच्या चौकशीदरम्यान नक्षलवादी असलेल्या या महिलेने तोंडावर पदर ओढून घेतला होता आणि प्रश्नांची उत्तरे देत होती. घटनेच्या २ दिवसानंतर संशयित महिला पीडित मुलीच्या गावी पोहोचली होती. पीडित मुलीच्या घरात राहून ती घरातील सदस्यांना भडकवत असल्याचा आरोप आता केला जात आहे. पीडितेची वहिनी म्हणून घरात वावरणाऱ्या नक्षलवादी महिलेच्या कॉल डिटेल्समधून धक्कादायक माहिती देखील समोर आली आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0