साहित्य संमेलनात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अवमानाचा निषेध ठराव मांडा : उस्मानाबादकरांची एकमुखाने मागणी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jan-2020
Total Views |
Facebook Image _1 &n


सावरकरप्रेमींची ९३ व्या अ.भा.साहित्य संमेलनाचे अध्यक्षांकडे निवेदन


 

धाराशिव : स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी काँग्रेस सेवा दलाच्या पुस्तिकेत घृणास्पद मजकूर प्रसिद्ध करण्यात आला. ही पुस्तके काँग्रेसकडून वितरित केली गेली. या घृणास्पद कृत्याच्या विरोधात उस्मानाबाद येथे होणाऱ्या ९३ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात निषेधाचा ठराव मांडण्याबाबत स्वागताध्यक्ष नितीन तावडे यांना निवेदन देण्यात आले.

 

१९३८ साली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मुंबई पार पडले होते. या संमेलनाचे भाग्य असे की माय मराठीच्या उत्सवाला अध्यक्ष म्हणून जाज्वल्य साहित्य निर्मितीचे अग्निकुंड स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे लाभले. सावरकरांनी मराठी भाषा समृद्ध करणारे विपुल लेखन केले. मराठी भाषा शुद्ध असावी यासाठी अनेक नवे शब्द रचना करून मराठी भाषेला आणखी समृद्ध केले. यामुळे हा ठराव मांडण्याचा आग्रह सावरकरप्रेमींकडून करण्यात आला आहे.
 

"स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या साहित्यिक उपलब्धीबाबत सर्व मराठी भाषिक नागरिक जाणतो. यांच्या साहित्य गीतसंपदा यावर आजही जीवापाड प्रेम करतो. अशा जाज्वल्य साहित्यिक महानुभावाची निवड 1938 च्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून झालेली होती, अशा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा घोर अपमान करणारी पत्रिका काँग्रेस सेवादलाने नुकतीच प्रकाशित केली आहे,यातील मजकुर पाहून कोणताही मराठी माणूस क्रुद्ध झाल्याशिवाय राहणार नाही असे हे किळसवाणे लिखाण आहे.", असा निषेधाचा सूर यावेळी उपस्थित स्वातंत्र्यवीर सावरकरप्रेमींमध्ये दिसून आला.



Sahitya Sammelan Osmanaab

 

'स्वातंत्र्यवीर सावरकर हे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राहिलेले व्यक्तिमत्त्व आणि ९३व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन धाराशिव (उस्मानाबाद)येथे होत आहे. एका साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी राहिलेल्या महापुरुषांचा घोर आणि क्रुर अपमान याच काळात व्हावा ही अत्यंत घृणास्पद बाब आहे. आजवर या साहित्यिक, भाषाप्रभु, देशभक्त पुत्राचा अपमान त्यांचे विरोधी नेते करत राहिले, पण यावेळेस सावरकर द्वेषाच्या सर्व सीमा ओलांडल्या आहेत, याचा निषेध या साहित्य संमेलनात व्हावा, तसा ठराव साहित्य संमेलनाच्या निर्णय प्रक्रियेत असणाऱ्या विद्ववतजनानी घ्यावा....इतकी अपेक्षा त्या अनुषंगाने आपण निषेध करणारा ठराव घ्यावा, अशी अपेक्षा स्वागताध्यक्षांकडे व्यक्त करण्यात आली आहे.

 

निवेदन देताना, डॉ. हर्षल डंबळ ,डॉ. गोविंद कोकाटे ,रामदास कोळगे, ह. भ. प. बाबुराव पुजारी, प्रविण पाठक, महेश वडगावकर ,तानाजी पाटील , ऍड. नितीन भोसले, ऍड. महेश निंगोळे, संतोष क्षिरसागर, राहुल काकडे, महेश चांदणे, प्रमोद बचाटे, गौतम ठेले, सिद्धू गोफने, संजय दळवे, रमेश अप्पा रणदिवे, विनायक निंबाळकर, मोहन खापरे, महादेव साळुंके, यश मंजुळे, लिंबराज साळुंके, विनोद रसाळ, योगेश ढोबळे यांच्यासह मोठ्या संख्येने सावरकरप्रेमी नागरिक उपस्थित होते.









@@AUTHORINFO_V1@@