प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाचा बंपर ‘बोनस’

    दिनांक  08-Jan-2020 17:22:27
|

gashmeer_1  H xया नवीन वर्षात मराठी प्रेक्षकांना मनोरंजनाचा बंपर ‘बोनस’ मिळणार आहे. ‘देऊळबंद’, ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’, ‘कान्हा’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांचा अभिनेता गश्मीर महाजनी हा ‘बोनस’ घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या’ बोनस’ची मजा दुप्पट करायला त्याला साथ देणार आहे अभिनेत्री पूजा सावंत. ‘दगडी चाळ’, ‘लपाछपी’, ‘जंगली’ सारख्या चित्रपटांतून अभिनेत्री पूजा सावंत हिने प्रेक्षकांचे मनोरंजन केले.


गश्मीर महाजनी आणि पूजा सावंत अभिनित ‘बोनस’ या चित्रपटाचे पोस्टर बुधवारी प्रदर्शित करण्यात आले. या चित्रपटातून पूजा आनिओ गश्मीर ही नवीन फ्रेश जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘बोनस’ ची कथा सौरभ भावे यांनी लिहिली असून, दिग्दर्शनाची बाजूही त्यांनी सांभाळली आहे. या आधी त्यांनी हापूस
, ताऱ्यांचे बेट, हृदयांतर, चुंबक या चित्रपटांचे पटकथा लेखन केले होते.
या कथेबद्दल सांगताना सौरभ भावे म्हणतात, “बोनस म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या नशिबात असलेली अधिकची गोष्ट. त्यात मग पैसा, आनंद आणि सुख या गोष्टींचा समावेश होतो. पण दुर्दैवाने काहींना हे भाग्य लाभते आणि त्यांच्या आयुष्यात या सगळ्या गोष्टी येतात तर काहींना यातील काहीच मिळत नाही. ‘बोनस’चा प्रयत्न या दोन्हींना एकत्र आणण्याचा आहे. ‘आहेरे’ आणि ‘नाहीरे’ यांची ही दोन भिन्न जगे आहेत. ‘बोनस’ हा एक अशा मुलाचा आनंदप्रवास आहे की, आपल्या वाट्याचे चांगले प्रसंग जगाबरोबर शेअर करताना त्याचे आयुष्य बदलून जाते आणि त्याच्या धारणाही संपूर्णपणे बदलून जातात.”


लायन क्राऊन एंटरटेन्मेंट’ आणि ‘जीसिम्स’ यांची प्रस्तुती असलेला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात २८ फेब्रुवारी २०२० रोजी प्रदर्शित होणार आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.