दीपिकाचा ‘छपाक’ पुन्हा वादात

08 Jan 2020 15:55:06

deepika_1  H x



बॉलीवूड आणि वाद हे समीकरण तसे प्रेक्षकांना नवीन नाही. एखादा बिग बजेट चित्रपट बनतानाच त्याबाबतचे नवीन नवीन वाद चव्हाट्यावर येण्यास सुरुवात होते. अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या आगामी बहुचर्चित ‘छपाक’ चित्रपटाबद्दलही असेच नवनवीन वाद रोज समोर येत आहे. दीपिकाने जेएनयुमध्ये जाऊन तेथील विद्यार्थ्यांना पाठींबा दर्शवल्याने तिच्या वर टीकेची झोड सुरु होती आणि इतक्यातच तिच्या चित्रपटातील एका व्यक्तिरेखेच्या नावामुळे ‘छपाक’ही आता वादात अडकला आहे.


‘छपाक’ची कथा ही २००५ मध्ये अॅसिड हल्ल्यात जखमी झालेल्या ‘लक्ष्मी अग्रवाल’ हिच्या आयुष्यावर बेतलेली आहे. लग्नाला नकार दिल्यामुळे ‘गुड्डू’ उर्फ नइम खान या मुस्लीम इसमाने लक्ष्मीवर अॅसिड हल्ला केला होता. मात्र या चित्रपटात नायिका ‘मालती’ हिच्यावर अॅसिड हल्ला करणाऱ्या व्यक्तीरेखेचे नाव ‘राजेश’ ठेवण्यात आले आहे. यामुळे चित्रपटाच्या निर्मात्यांनी सोयीस्करपणे नाव बदलून गुन्हेगाराचा धर्मही बदलला असल्याचा आरोप प्रेक्षक आणि चाहत्यांनी केला. गुन्हेगाराचा धर्म बदलून त्या व्यक्तिरेखेला त्याला हिंदू नाव देण्यात आल्याने अनेकांनी या चित्रपटाची तिकीटे रद्द केली आहेत.

Powered By Sangraha 9.0