'फ्री काश्मीर'च्या घोषणा का? फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

    दिनांक  07-Jan-2020 11:20:02
|


asf_1  H x W: 0

 


मुंबई : मुंबईमध्ये सोमवारी रात्री जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलने करण्यात आली. या आंदोलनामध्ये एका मुलीने हातात फलक घेऊन काश्मीर मुक्तीच्या घोषणा केल्या. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ट्विट करत काश्मीर मुक्तीच्या घोषणा का? असा खडा सवाल विचारला आहे.

 
 
 

देवेंद्र फडणवीस यांनी 'फ्री काश्मीर' या आशयाच्या फलकासंदर्भातील ट्विटचा आधार घेतला. 'हे आंदोलन नक्की कशाचे आहे आणि काश्मीर मुक्तीच्या घोषणा का?' असा प्रश्न त्यांनी ट्विट करत उपस्थित केला. तसेच या फुटरीता वाद्यांना आपण का सहन करायचे, असाही सवाल त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला आहे. 'उद्धवजी तुमच्या समोर अशा प्रकारच्या भारतविरोधी घोषणा दिल्या जात आहेत आणि तुम्ही ते सहन करता का?' असा टोलाही त्यांनी यावेळी उद्धव ठाकरेंना केला.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.