काँग्रेस जातीच्या आधारे देशाचे विभाजन करण्याच्या प्रयत्नात : जावडेकर

07 Jan 2020 16:53:10


javdekar_1  H x



नवी दिल्ली : 'काँग्रेस जातीच्या आधारे देशाचे विभाजन करण्याचा प्रयत्न करत आहे,' अशी टीका केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली. दरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन (सीएए) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना त्यांचा उल्लेख भारताचे हिंदू जिनाअसा केला. यालाच प्रत्युत्तर देताना प्रकाश जावडेकर यांनी काँग्रेसवर शाब्दिक हल्ला चढविला.


केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विट करत म्हणाले की
, “गेल्या अनेक दशकांपासून अल्पसंख्याकांचा व्होट बँक म्हणून वापर करणारी काँग्रेस देशात जातीच्या आधारे विभाजन करण्याचा प्रयत्न करत आहे. आसामचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते तरुण गोगोई यांनी हिंदू जिना असे वक्तव्य काँग्रेसचा जातीय सलोखा बिघडवण्याचा अजून एकएक निंदनीय प्रयत्न आहे."


काँग्रेसचे नेते तरुण गोगोई यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताचे
हिंदू जिनाअसल्याची टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी धर्माच्या आधारे विभाजन करण्याचा मोहम्मद अली जिना यांचा दोन देश सिद्धांतराबवत आहेत असा आरोप त्यांनी केला होता.

Powered By Sangraha 9.0