'शिवसेना नेते हे तर आता 'सोनिया सैनिक''

07 Jan 2020 13:23:39


sambit patra_1  


नवी दिल्ली : गेट वे ऑफ इंडियावर काळ रात्री जेएनयू घटनेच्या निषेधार्थ काल रात्री 'फ्री काश्मीर'चे झळकविल्यानंतर भाजप नेते संबित पात्रा यांनी मंगळवारी उद्धव ठाकरे व शिवसेना नेत्यांवर जोरदार टीका केली व हे सर्व आता 'सोनिया सैनिक' असल्याचा दावा केला.


"शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुंबई निषेधातील 'फ्री काश्मीर' पोस्टरचा बचाव केला. माझा विश्वास आहे कि तुकडे तुकडे गँगवर निष्ठा दाखवण्याऱ्या या सोनिया सैनिकांकडून लवकरच प्रभू रामची बदनामी ऐकू येईल आणि लवकरच त्यांची स्वतःची हिंदू दहशतवादही आवृत्ती येऊ शकेल!"




दरम्यान आज शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी दावा केला की
," 'फ्री काश्मीर' बॅनर इंटरनेट व मोबाइल सेवावरील बंदीपासून मुक्ततेबद्दल आहे. तथापि, काश्मीर स्वातंत्र्याची कोणतीही मागणी शिवसेनेतर्फे खपवून घेतली जाणार नाही, "असा दावाही त्यांनी केला. या प्रकरणावरुन शिवसेनेवर हल्ला चढवत महाराष्ट्राचे माजी व विरोधी पक्षनेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही प्रश्न उपस्थित केले आणि मुंबईत अशा फुटीरतावादी घटकांना कसे सहन केले जाऊ शकते असा सवाल केला होता.

 

Powered By Sangraha 9.0