हर्षवर्धन की शैलेश ; कोण होणार नवा महाराष्ट्र केसरी?

07 Jan 2020 14:00:52


saf_1  H x W: 0


पुणे : म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात सुरू असलेली महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही अंतिम टप्प्यात आली आहे. या स्पर्धेची अंतिम लढत शैलेश शेळके आणि हर्षवर्धन सदगीर यांच्यात होणार आहे. माती विभागात शैलेश शेळकेने गतवर्षीच्या विजेत्या बाळा रफिकला धूळ चरणाऱ्या सोलापूरच्या ज्ञानेश्वर जमदाडे चितपट करत अंतिम फेरी गाठली. दुसरीकडे, गादी विभागात महाराष्ट्र केसरी २०१८चा विजेता पुण्याच्या अभिजीत कटकेला धूर चारत नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने अंतिम फेरीत प्रवेश मिळवला.

 

दोन्ही गतविजेत्या अंतिम फेरीआधी बाहेर पडल्यामुळे महाराष्ट्र केसरीची गदा नव्या चेहऱ्याच्या हातात जाणार हे आधीच निश्चित झाले होते. विशेष म्हणजे, अंतिम फेरीत धडक मारलेले शैलेश शेळके आणि हर्षवर्धन सदगीर या दोघांमध्येही एक समान धागा आहे. हे दोघेही 'अर्जुन पूरस्कार' विजेते कुस्तीपटू आणि प्रशिक्षक काका पवार यांच्या तालमीमधले कुस्तीवीर आहेत. यामुळे सर्वांचे लक्ष महाराष्ट्र केसरी २२०च्या अंतिम फेरीकडे लागले आहे.

Powered By Sangraha 9.0