एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांचे अभाविप कार्यालयांवर हल्ले

07 Jan 2020 17:37:21

abvp_1  H x W:



अहमदाबाद :अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विविध शहरांतील कार्यालयांवर राष्ट्रवादी व एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांनी हल्ले करत तोडफोड केली आहे. या हल्ल्यांमध्ये अभाविपचे काही सदस्य गंभीर जखमी झाले आहेत. अभाविपने याबाबत संबंधित पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. कालपर्यंत दोन विद्यार्थी संघटनेत असणाऱ्या या भांडणात आता संबंधित राजकीय पक्षांनी देखील उडी घेतली आहे.




त्याचप्रमाणे अहमदाबादबरोबरच नाशिक व पुणेस्थित कार्यालयांवर राष्ट्रवादीकडून हल्ले करत राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून सदाशिव पेठेतील अभाविप कार्यालयाच्या नामफलकांना काळे फासण्यात आल्याचा प्रकार घडला आहे तसेच तोडफोड करण्यात आली आहे. याबाबत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने या सर्व घटनांचा निषेध करत ट्विट केले की ,"अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अशा हिंसक घटनांचा तीव्र निषेध करते आणि अशा राजकीय पक्षांकडून होणार्‍या विषबाधा त्वरित रोखण्याची मागणी आम्ही करत आहोत.अशा घटना लोकशाही व्यवस्था बिघडवणाऱ्या आहेत, मतभेदांवर संवाद असायला हवा हे आम्हाला स्पष्ट आहे."
Powered By Sangraha 9.0