महाविकास आघाडीला 'गळती' ; स्थानिक पदाधिकाऱ्याचा मनसेत प्रवेश

    दिनांक  06-Jan-2020 16:58:52
|


saf_1  H x W: 0


मुंबई : अनेक निर्णयांमुळे महाराष्ट्रात प्रस्थापित झालेल्या महाविकास आघाडीबद्दल जनमानसामध्ये खदखद निर्माण झाली आहे. मिळालेली सत्ता, त्यानंतर मोठ्या कालावधीनंतर झालेले खाते वाटप, आणि त्यावर उमटणारी मंत्र्यांची नाराजी यामुळे कार्यकर्त्यांच्या मनात महाविकास आघाडीबद्दल नाराजीचे सूर उमटत आहे. नुकतेच पक्षाच्या निर्णयांमुळे नाराज असलेल्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील काही पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण पक्षात प्रवेश केला आहे.

 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कृष्णकुंजवर जाऊन मनसेत प्रवेश केला. या पक्षप्रवेशामध्ये रायगडमधील पेण, मुरुड भागातील कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. याशिवाय विविध शहरे, तालुक्यांतील पदाधिकाऱ्यांनीही राज ठाकरेंच्या मनसेत प्रवेश केला आहे. यामुळे महाविकास आघाडीसमोर आता सत्ता टिकवण्यासोबतच पक्षाशी निगडित असलेले नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना जोडून ठेवण्याची नामुष्की ओढवलेली आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.