
भारताचे ‘मिसाइल मॅन’ अर्थात माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची कारकीर्द आता मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. गेल्या काही वर्षांपासून चित्रपटसृष्टीत बायोपिकची हवा आहे. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी’, ‘मेरी कॉम’, ‘एम.एस.धोनी’, ‘मिल्खा सिंग’ यांच्या बायोपिकनंतर आता अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची तयारी जोरदार सुरू आहे.
या चित्रपटात अभिनेते परेश रावल अब्दुल कलाम यांची व्यक्तिरेखा साकारणार आहेत. स्वतः परेश रावल यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही बातमी चाहत्यांपर्यंत पोहोचवली आहे. 'माझ्यामते कलाम हे संत होते. त्यांची व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मला मिळाल्याने मी स्वत:ला खूप भाग्यवान समजतो.' या शब्दांत परेश रावल यांनी आपला आनंद व्यक्त करत या चित्रपटाची माहिती दिली.