महाराष्ट्र केसरी २०२० : गतविजेता बाला रफिक चितपट

06 Jan 2020 18:36:21


saf_1  H x W: 0


पुणे : पुण्यामध्ये चालू असलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये सोमवारी धक्कादायक निकाल समोर आला. गतविजेता बाला रफिक शेखला चितपट करत सोलापूर शहर संघाच्या माऊली उर्फ ज्ञानेश्वर जमदाडेने बाजी मारली. तसेच, गत उपविजेता अभिजीत कटकेही नाशिकच्या हर्षवर्धन सदगिरकडून पराभूत झाला आहे. त्यामुळे यावर्षी महाराष्ट्र केसरीची गदा नव्या हातांमध्ये जाणार हे निश्चित झाले आहे.

 

पुण्यात म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात ही स्पर्धा सुरू आहे. माती विभागात झालेल्या पाचव्या फेरीत बुलडाण्याच्या बाला रफिक याने चांगली सुरुवात केली. परंतु, काही मिनिटांमध्येच ज्ञानेश्वर जमदाडेने चपळाईने हरवले. या विजयासह माऊलीने माती विभागातून उपांत्य फेरी गाठली. माती विभागातील विजेता आणि गादी विभागातील विजेता यांच्यात महाराष्ट्र केसरी किताबाची लढत होणार आहे.

Powered By Sangraha 9.0