पुण्यात पॅनकार्ड क्लबच्या इमारतीला आग

    दिनांक  06-Jan-2020 15:00:04
|
Pune pancard _2 &nbs
 

पुणे : पुण्यातील बाणेर परिसरात पॅनकार्ड क्लबच्या या आलिशान इमारतीला सोमवारी दुपारी भीषण आग लागल्याने या भागात एकच खळबळ उडाली. दुपारी दीड वाजता पॅनकार्ड क्लब डोमला आग लागली. स्थानिकांच्या ही बाब लक्षात आल्याने अग्निशमन दलाला याबद्दल माहिती देण्यात आली. सध्या पॅनकार्ड क्लब प्रकरण न्यायालयीन वादामुळए बंद आहे. आगीने अल्पावधीतच संपूर्ण डोम गिळंकृत केल्याने आगीचे रूप गंभीर झाले आहे. पुणे अग्निशमन दलाच्या पाच गाड्या आणि जवान आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.


Pune pancard _1 &nbs

 

पॅनकार्ड क्लब हे अलिशान व अद्यावत सोयींनी युक्त हॉटेल सेवा देणारी कंपनी आहे. पुण्यातील या कंपनीची इमारत काही दिवसांपासून बंद आहे. इमारतीच्या माध्यमाद्वारे संपूर्ण राज्यभरात पॅनकार्डचा व्यवहार केला जातो. जवळपास ४५ ते ५० फूट उंच इमारतीच्या या डोमला अचानक आग लागली. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. इमारतीतील फायबरच्या समानामुळे आग मोठ्या प्रमाणात पसरत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या आगीमुळे आकाशात धुराचे मोठे लोळ उठले आहेत.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.