दिल्ली विधानसभेची निवडणूक जाहीर

06 Jan 2020 16:10:57

delhi_1  H x W:



दिल्ली : दिल्ली विधानसभेसाठी ८ फेब्रुवारीला मतदान होणार असून मतमोजणी या ११ फेब्रुवारी रोजी होणार आहे. आजपासूनच निवडणूक आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. एकाच टप्प्यात निवडणूक होणार असून या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.



२२ फेब्रुवारी रोजी दिल्ली विधानसभेची मुदत संपणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी आज दिल्ली विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. विधानसभा निवडणुकीसाठी आयोगाने पूर्ण तयारी केली असल्याची माहिती त्यांनी दिली. निवडणुकीत १३७५० पोलिंग बूथवर जवळपास १.४६ कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. विधानसभा निवडणुकीची अधिसूचना १४ जानेवारी प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर निवडणूक अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. निवडणूक अर्ज २१ जानेवारीपर्यंत दाखल करता येणार आहे. तर, ८ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून ११ फेब्रुवारी मतमोजणी होणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी दिली.




Powered By Sangraha 9.0