जेएनयु प्रकरणी अज्ञातांवर गुन्हा दाखल

06 Jan 2020 12:37:46

amit_1  H x W:



मुंबई : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील हिंसाचारप्रकरणी दिल्ली पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मालमत्तेचे नुकसान आणि हिंसाचार केल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


आम्ही जेएनयुमधील हिंसाचाराची गंभीर दाखल घेतली आहे. सोशल मिडिया आणि सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून या घटनेचा तपास केला जात आहे, अशी माहिती डीसीपी देवेंद्र आर्या यांनी दिली आहे. दरम्यान हिंसाचारातील ३४ जखमी विद्यार्थ्यांना सोमवारी उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.


केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जेएनयुमधील हिंसाचार प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहे. या प्रकरणी अमित शहा यांनी दिल्लीचे पोलीस आयुक्त अमुल्य पटनाईक यांच्याशी चर्चा केली आहे. तसेच त्यांनी दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्याशी देखील चर्चा केली आहे. जेएनयुमधील प्रतिनिधींना बोलवा आणि चर्चा करा अशा सूचना देखील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्या आहेत.

Powered By Sangraha 9.0