अमेरिका-इराणमधील संघर्ष आणखी चिघळणार ?

05 Jan 2020 16:04:37
IRAN _1  H x W:


बगदाद : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष रविवारी आणखीन चिघळल्याचे पहायाला मिळाले. इराकची राजधानी बगदादमध्ये अमेरिकेने नुकत्याच दोन दिवसांपूर्वी ड्रोनद्वारे केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात इराणी लष्करातील परदेशात काम करणार्‍या जनरल कासीम सुलेमानी मारला गेला होता. याला प्रत्युत्तर देण्यासाठी दुसर्‍याच दिवशी रविवारी पहाटे इराणने प्रतिहल्ला चढवला असून बगदादमधील अमेरिकी दुतावास कार्यालयासह अमेरिकेच्या अन्य ठिकाणांवर क्षेपणास्त्र डागले.

 

इतकेच नव्हे तर प्रमुख श्रद्धास्थान असलेल्या जामकरण मशिदीवर लाल झेंडा फडकावत इराणने अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारल्याचे संकेत दिले. इराणच्या या कृत्यानंतर अमेरिकेनेही आक्रमक पवित्रा घेतला आहे. आमच्या ठिकाणांना लक्ष्य करणारा कुणीही असला तरी त्याला हुडकून त्याचा खात्मा करण्यात येईल, अशी धमकी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली. इराकच्या या हल्ल्यात जीवितहानी झाल्याचे अद्याप कोणतेही वृत्त नाही. या हल्ल्यानंतर बगदादमध्ये अमेरिकेच्या विमानांच्या घिरट्या सुरू झाल्या आहेत. दरम्यान, इराकच्या मध्यवर्ती भागातील बलाद हवाईतळावरही क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात आला आहे.

Powered By Sangraha 9.0