जेएनयूत राडा ; विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षासह शिक्षक जखमी

05 Jan 2020 21:24:31


jnu_1  H x W: 0



नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या मुलीच्या वसतिगृहात काही अज्ञातांनी आज हल्ला केला. या हल्ल्यात वसतिगृहातील मुलींसह,शिक्षकांना विद्यापीठ परिसरातील लाकडी व धातूच्या रॉडने मारहाण केली. या हल्ल्यात जवाहरल नेहरू युनिव्हर्सिटी स्टूडंट्स युनियन (जेएनयूएसयू) चे दोन अधिकारी-पदाधिकारी, ज्यात अध्यक्ष आयशा घोष यांच्यासह शिक्षकांवर चेहरे झाकलेल्या अज्ञातांकडून हा हल्ला करण्यात आला आहे.



जेएनयूचे अध्यक्ष एबीव्हीपी दुर्गेश म्हणाले की
सुमारे ५०० डावे विद्यार्थी अचानक वसतिगृहात जमा झाले. ते सर्व लाठी व काठीने सशस्त्र होते. त्यांनी वसतिगृहांची तोडफोड सुरू केली. त्यानंतर त्यांनी खोलीत घुसून विद्यार्थ्यांना मारहाण केली. या घटनेत एबीव्हीपी नेते आणि जेएनयू विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष मनीष यांना खूप त्रास सहन करावा लागला आहे. व्हिडिओमध्ये असे दिसते आहे की, वसतिगृहात काचेचे तुकडे विखुरलेले आणि तोडलेले आहेत. तसेच, हातात दांडी आणि रॉड असलेले अज्ञात चेहरे झाकून दहशत निर्माण करत आहेत. या गुंडांनी सुमारे ८ तास हिंसाचार आणि दंगली केल्या. या घटनेनंतर एबीव्हीपीचे २ विद्यार्थी बेपत्ता असल्याची माहिती आहे. इतर काही विद्यार्थ्यांनाही याची कल्पना नाही. या हल्ल्यात २५ विद्यार्थी जखमी झाले आहेत. एकूण ११ विद्यार्थी अद्याप बेपत्ता असल्याची नोंद आहे. असे सांगितले जात आहे की मुखवटे घालणारे गुंड बाहेरील लोकही असू शकतात.




या हल्ल्यात गंभीर जखमी झालेली युनिव्हर्सिटी स्टूडंट्स युनियनची अध्यक्षा आयशा घोष म्हणाली
, "चेहरा झाकलेल्या काही लोकांनी मला बेदम मारहाण केली. मला माहित नाही की ते कोण होते." यावेळी गंभीर जखमी होती तिच्या डोक्यातून रक्त वाहू लागले असल्याने तिला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले आहे. या हल्ल्यात जेएनयूएसयूचे सरचिटणीस सतीश चंद्रही जखमी झाले. हल्ल्यादरम्यान वसतिगृहांच्या खोल्या आणि लॉबीची तोडफोड करण्यात आली आहे. पार्किंगमध्ये असलेल्या अनेक वाहनांची देखील अज्ञात इसमांनी तोडफोड केली आहे. याप्रकरणी विद्यापीठ प्रशासनाकडून शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना घटनास्थळी बोलविण्यात आले आहे. अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेकडूनही या हल्ल्याचा निषेध करण्यात आला आहे. एबीव्हीपीने दिल्ली पोलिसांना  विद्यार्थ्यांना वाचवण्याचे आवाहन केले आहे. खुर्च्या व टेबलांच्या खाली स्वत:लपून राहिलेल्या बर्‍याच विद्यार्थ्यांनी मास्क घातलेल्या गुंडांच्या दहशतीतून स्वत:ला वाचवले. व्हॅलेंटीना ब्रह्मा या विद्यार्थ्याने सांगितले की, 'डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांनी तिला मारहाण केली. त्यांनी विचारले आता विद्यार्थी नोंदणीसाठी कुठे जातील?'



एबीव्हीपीच्या आरोपांच्या विरोधात डाव्या विद्यार्थी संघटनांनी जेएनयूमधील हिंसाचाराचा आरोप एबीव्हीपीवर केला आहे. हिंसाचार कोणत्या पक्षाने केला हे पोलिसांच्या तपासणीनंतरच स्पष्ट होईल
, परंतु वरील व्हिडिओमध्ये दिसणार्‍या महिला सुरक्षा रक्षकाने स्पष्ट सांगितले आहे की, ग्रीन शाल परिधान केलेल्या पेरियार हॉस्टेलच्या दाढीवाला मुलाने लाथ मारली. यावर बोलताना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या घटनेबाबत चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले,"जेएनयूमध्ये झालेल्या हिंसाचाराबद्दल मला चिंता वाटते. विद्यार्थ्यांवर अत्यंत क्रूर हल्ले केले आहे . पोलिसांनी तातडीने हिंसाचार रोखून शांतता प्रस्थापित केली. जर आमचे विद्यार्थी युनिव्हर्स कॅम्पसमध्ये सुरक्षित नसतील तर देशाची प्रगती कशी होईल?"



Powered By Sangraha 9.0